AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Diwali Fire: दिवाळीमध्ये मुंबईत अग्नितांडव! फायर ब्रिगेडसमोरचं पाण्याचं संकट, स्विमिंग पूल, विहीरींमधून पाणी उचलण्याची वेळ

Mumbai Diwali Fire Incidents: मुंबईत दिवाळीमध्ये आगीच्या घटनांनी दोन वर्षांचा विक्रम मोडला. यंदाच्या दिवाळीत मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. तर त्याचवेळी फायर ब्रिगेडसमोरचं पाण्याचं संकट उभे ठाकले आहे. स्विमिंग पूल, विहीरींमधून पाणी उचलण्याची वेळ विभागावर आली आहे.

Mumbai Diwali Fire: दिवाळीमध्ये मुंबईत अग्नितांडव! फायर ब्रिगेडसमोरचं पाण्याचं संकट, स्विमिंग पूल, विहीरींमधून पाणी उचलण्याची वेळ
मुंबईत अग्नितांडव! फायर ब्रिगेडसमोरचं पाण्याचं संकट
| Updated on: Nov 12, 2026 | 9:18 AM
Share

Mumbai Fire Brigade: मुंबईत दिवाळीमध्ये आगीच्या घटनांनी दोन वर्षांचा विक्रम मोडला. यंदाच्या दिवाळीत मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईत आगीच्या एकूण ४९९ घटना घडल्या. हा आकडा गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी आहे. पण त्याचवेळी मुंबईतील अग्निशमन विभागासमोरही मोठे जलसंकट उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल विभागावर स्विमिंग पूल, विहीरींमधून पाणी उचलण्याची वेळ आली आहे.

फटक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईत आगीच्या एकूण ४९९ घटना घडल्या. त्यापैकी ३३३ आगीच्या घटना फटाक्यांमुळे घडल्याची नोंद समोर आली आहे. या दुर्घटनांमध्ये १० जण जखमी, तर एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी विक्रमी उच्चांक गाठला. २०२४ मध्ये दिवाळीत आगीच्या २६२ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ८० फटाक्यांमुळे झाल्या होत्या. २०२५ मध्ये आगीच्या २८९ घटनांची नोंद झाली, त्यापैकी ११३ फटाक्यांमुळे झाली आहे.

यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (८ नोव्हेंबर) सर्वाधिक १४२ आगीच्या घटना, त्यापैकी १३७ फटाक्यांमुळे

९ नोव्हेंबरला १६६ आगीच्या घटना, त्यापैकी १४४ फटाक्यांमुळे

१० नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या दिवशी १०२ आगीच्या घटना, त्यापैकी २४ फटाक्यांमुळे

मालाड मालवणी येथे फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालूनही सर्रास नियमांचे उल्लंघन

उंच इमारतींचे छत, बाल्कनी, खिडक्या आणि ज्वलनशील वस्तूंवर रॉकेट पडून आग लागण्याचा धोका

अग्निशमन दलासमोर मोठे जलसंकट

मुंबईत आगी विझवतांना पाण्याच्या तुटवड्यामुळे अग्निशमन दलासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. स्विमिंग पूल, इमारतींच्या भूमिगत टाक्या, विहीरींमधून पाणी घेण्याची वेळ विभागावर आली आहे. एकीकडे दुष्काळजन्य स्थिती, मुंबईतही पाणी तुटवडा असतांना लाखो लिटर पाणी आगी विझवण्याकरता वापरले गेले. दिवाळीच्या दिवसांत मुंबई अग्निशमन दल रस्त्यावर होते. यामध्ये 1150 कर्मचारी आणि 68 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अग्निशमन दलाची सज्जता

39 फायर इंजिन , (साडे चार हजार लिटर प्रती क्षमता)

23 जम्बो टॅकर, 2 वॉटर टॅकर (15 हजार लिटर प्रतिक्षमता)

6 हायराईज फायर फायटर, 6 एरिअल वॉटर टॅकर

2 मिनी वॉटर टॅकर, 2 मिनी फायर इंजिन

अग्निशमन दलाचे 1150 जवान आणि 68 वरिष्ठ अधिकारी दिवाळीच्या दिवसात सलग 24 तास कर्तव्यावर

यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव

फटक्यांवर बंदी आणि आगीच्या दुर्घटना घडू नये यासाठीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन अधिकाऱ्यांवर असते. मात्र कारवाई नेमकी कोणी आणि कशी करायची, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने यंत्रणा अपयशी ठरल्या. त्यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदीनंतर किती ठिकाणी कारवाई झाली, याची आकडेवारीही महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बॉलिवूड कलाकारांच्या माध्यमातून फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. जनजागृती आणि बंदी असूनही फटाक्यांचा वापर आणि आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसली.

Follow Us
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!