Kiara Advani: यशसोबतचा इंटिमेट सीन पाहाताच सिद्धार्थ… कियारा आडवाणीने केला मोठा खुलासा
Kiara Advani: टॉक्सिक या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणीने अभिनेता यशसोबत इंटिमेट सीन दिला आहे. आता कियाराने पती सिद्धार्थने हा सीन पाहिल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती? हे सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी काही दिवसांपूर्वी ‘टॉक्सिक’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाची संपूर्ण देशात चर्चा झाली. पण चित्रपट फारसा चालला नाही. यात यश मुख्य भूमिकेत होता. यश आणि कियारा यांची चित्रपटामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता कियाराने चित्रपटाच्या अपयशाबाबत आणि यशसोबतच्या बोल्ड सीनबाबत सिद्धार्थ मल्होत्राची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले आहे. हे सर्व कियाराने करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सांगितले.
‘टॉक्सिक’च्या अपयशाबाबत कियारा काय म्हणाली?
कियारा म्हणाली की, “एक टीम म्हणून आम्हाला कधीच अशी अपेक्षा नव्हती किंवा आम्हाला असे वाटतच नव्हते. ओपनिंग वीकेंडमध्ये खूप वाईट वाटले होते. मी खूप लो फिल करत होते. पण नंतर मी पाहिले की लोक माझी प्रशंसा करत होते की मी कशी माझ्या कम्फर्ट झोनबाहेर आले. मला वाटते ‘टॉक्सिक’ आणि माझ्या नादियाच्या भूमिकेने माझ्या जर्नीला परिभाषित केले.”
यश-कियाराच्या इंटीमेट सीनबाबत सिद्धार्थची प्रतिक्रिया
कियाराने यशसोबतच्या बोल्ड सीनबाबतही वक्तव्य केले. करण जोहरने म्हटले की काही लोकांना या सीनबाबत सिद्धार्थची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्यायचे होते. यावर कियारा म्हणाली, “सिद्धार्थ मला योग्य पद्धतीने समजून घेतो. त्याला या गोष्टीने फरक पडत नाही. याआधी अनेक जबरदस्त अभिनेत्यांना याचा सामना करावा लागला आहे, जसे ऐश्वर्या राय. जेव्हा मी पाहिले की इंटरनेटवर काय सुरू आहे, तेव्हा लोकांकडून खूप तीव्र प्रतिक्रिया आल्या. लोक आधीच यावर प्रश्न उपस्थित करू लागले होते, त्यामुळे मला याला योग्य ठरवण्याची गरज वाटली नाही.”
‘टॉक्सिक’ सिनेमाबद्दल जाणून घ्या
‘टॉक्सिक’ सिनेमामध्ये यश, कियारा यांच्याशिवाय नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, रुकमिणी वसंत यांनाही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘टॉक्सिक’ चित्रपट ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, पण सॅकनीलिकच्या अहवालानुसार चित्रपटाने जगभरात ३४२.२६ कोटींची कमाई केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी देखील जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.
