AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U-19 Asia Cup semifinal : वीरेंद्र सेहवाग सारखाच त्याचा मुलगा आर्यवीर समोरच्या गोलंदाजांची वाट लावतोय, आज सेमीफायनल मॅचमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा

U-19 Asia Cup semifinal : सध्या आशिया कप अंडर 19 टुर्नामेंट सुरु आहे. आज महत्वाची सेमीफायनलची मॅच आहे. टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरकडून भरपूर अपेक्षा आहेत. कारण तो सातत्याने धावा करतोय.

U-19 Asia Cup semifinal : वीरेंद्र सेहवाग सारखाच त्याचा मुलगा आर्यवीर समोरच्या गोलंदाजांची वाट लावतोय, आज सेमीफायनल मॅचमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा
Aryavir SehwagImage Credit source: Screengrab@SonyLIV
| Updated on: Nov 12, 2026 | 8:39 AM
Share

टीम इंडियाचा माजी स्फोटक ओपनर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग सध्या तुफान बॅटिंग करतोय. अंडर 19 आशिया कप टुर्नामेंटमध्ये त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय, त्यामुळे भारतीय संघाच्या त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. आता आर्यवीर समोर टीम इंडियाला फायनल मध्ये पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आहे. गुरुवारी भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी होईल. ही सेमीफायनल मॅच असून फायनलमध्ये दाखल होण्यासाठी विजय महत्वाचा आहे. आज सकाळी 10.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल.

आर्यवीर या टुर्नामेंटमधील आतापर्यंतचा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे. त्याने तीन इनिंगमध्ये 252 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एक हाफ सेंच्युरी आहे. संयुक्त अरब अमीरात विरुद्ध मागच्या साखळी सामन्यात आर्यवीरने 168 चेंडूत 160 धावा फटकावल्या होत्या. त्याच्या या इनिंगमुळे टीम इंडियाने 309 धावांचा डोंगर उभा केला. हा सामना भारताने 70 धावांनी जिंकला.

लिस्टमध्ये आर्यवीर सर्वात टॉपवर

नेपाळ विरुद्ध नाबाद 70 धावा फटकावून आर्यवीरने या टुर्नामेंटमध्ये सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध त्याला फक्त 22 धावाच करता आल्या. UAE विरुद्ध 160 धावांच्या इनिंगने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. तीन इनिंगमध्ये 252 धावांसह टुर्नामेंटमधील फलंदाजांच्या लिस्टमध्ये आर्यवीर सर्वात टॉपवर आहे.

पाकिस्तान विरुद्ध अर्जुन राजपूतचा एकट्याचा संघर्ष

भारतीय टीमने ग्रुप स्टेजमध्ये नेपाळ आणि यूएईला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाला तीन विकेटने पराभव स्वीकारावा लागलेला. पाक विरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजीच्या कमकुवत बाजू समोर आलेल्या. पाकिस्तानच्या मजबूत गोलंदाजीसमोर भारताचा डाव 208 धावात आटोपला होता. अर्जुन राजपूतने 107 धावांनी इनिंग खेळून एकट्याने संघर्ष केला होता. पण दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नव्हती. फक्त चार फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला होता.

त्याच्या नावावर आतापर्यंत आठ विकेट

अर्जुन राजपूत सुद्धा भारतासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तान विरुद्ध शतक झळकवून त्याने भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. आता सेमीफायनलमध्ये सर्वच फलंदाजांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल. भारतीय संघाची ताकद फक्त फलंदाजीत नाहीय. मध्यमगती गोलंदाज ईशान सूदकडूनही अपेक्षा आहेत. त्याने आतापर्यंत आठ विकेट काढले आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज मनाल चौहानच्या खात्यात पाच विकेट आहेत. त्यानेच नेपाळ विरुद्ध विजयाचा पाया रचला होता. भारतीय गोलंदाजांनी नेपाळचा डाव अवघ्या 128 धावांवर आटोपला होता. त्यानंतर लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने विजयी लक्ष्य गाठलं होतं.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज