Maharashtra News LIVE : मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, कालच्या तुलनेत AQI 137 वरुन थेट146 वर
Maharashtra News LIVE : मुंबईच्या हवामान फटाक्यांमुळे दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. आता कालच्या तुलनेत आज प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली.
भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. मराठी सणाच्या दिवशी भोजपुरी गाणांचा ठेका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाराष्ट्राच्या सणाला मराठी गाणी सोडून भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित झाला. ‘महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ म्हणत मराठी माणसाने संताप व्यक्त केला.
-
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक महाकाय दरडीला जाऊन धडकला, ट्रक मध्ये आठ ते दहा जण प्रवास करत असल्याची माहिती. अपघातात एकाचा जागीच मृत्यू एक जण गंभीर तर आठ ते दहा जण किरकोळ जखमी. जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी केले दाखल
-
-
अखेर 24 दिवसानंतर फरार असलेले डॉ. भोजने दाम्पत्य अटकेत…
अखेर 24 दिवसानंतर फरार असलेले डॉ. भोजने दाम्पत्य अटकेत…डॉक्टर वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांना अमरावतीच्या साईनगर अकोली परिसरातून केली पोलिसांनी अटक….नवजात बाळाला ३ लाख ५० हजार रुपयात विकत असल्याच्या डॉक्टर भोजने यांच्यावर आरोप…१५ ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीची आपल्या दवाखान्यात प्रसूती करून ते बाळ दुसऱ्यांना विकत असल्याच कथित प्रकरण…
-
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांच्या बळींची मालिका
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांच्या बळींची मालिका सुरूच आहे. ताज्या घटनेत सावली तालुक्यातील बोरचांदली जंगलात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मूल तालुक्यातील ताडाळा येथील महिला संगीता पेडुकर वय वर्ष 55 ही सावली तालुक्यातील शेत शिवारात कापूस वेचणीसाठी गेली होती. मात्र अचानक वाघाने हल्ला करत तिला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
-
पाचोऱ्यात पहाटे चोरीचा थरार; नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार पसार
पाचोऱ्यात पहाटे चोरीचा थरार; नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार पसार. समर्थ व्हॅली परिसरातील घरात पहाटे चार ते साडेचारदरम्यान चोरीचा प्रयत्न. घरातील सदस्य आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद. चोरट्याच्या खिशात आढळले सोन्याचे दागिने; अन्य ठिकाणीही चोरी केल्याचा संशय
-
-
बदलापुरात छटपूजेवरून राजकीय वातावरण तापले
बदलापुरात छटपूजेवरून राजकीय वातावरण तापले. उल्हास नदीकाठी होणाऱ्या छटपूजेला मनसेचा विरोध
-
ऐन दिवाळीत अमूल दुधात प्रति लिटर चार रुपयाची दरवाढ
ऐन दिवाळीत अमूल दुधात प्रति लिटर चार रुपयाची दरवाढ झाल्याने ग्राहकांनी व्यक्त केल्या संतप्त भावना….. सरकारने दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये दरवाढ करून ग्राहकांवर अतिरिक्त भार लादू नये: ग्राहकांची मागणी. गेल्या सहा महिन्यात अमूलने दुसऱ्यांदा दुधाच्या दरवाढ करून ऐन दिवाळीत अमूलचे दूध चार रुपयांनी महागल्याने ग्राहकांना दैनंदिन खर्चामध्ये सोसावा लागणार अतिरिक्त भार… मनोरंजनाच्या गोष्टीचे दर वाढवा मात्र दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर वाढून गरिबावर अन्याय करू नका
-
-
जुन्नर तालुक्यात ३,५५४ शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद
राज्य सरकारच्या मिशन सुधार अभियान अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३५५४ लाभार्थी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहणार आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ३५५४ जणांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. दिवाळीनंतर तिसरा टप्पा तील उत्पन्न निर्धारित मर्यादित पडताळणी करण्यात येणार असून अंदाजे ४००० पेक्षा जास्त शिधापत्रिका धारकांचे रेशन बंद होणार आहे.
मुंबई महापालिकेने रॉकेट फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही अनेक भागांत आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटताना दिसले. रात्रीनंतर मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाढलेला दिसला. मात्र, इतर वेळी दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या पातळीपर्यंत तो पोहोचला नसल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले. मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. आता काल मुंबईचा AQI 137 तर आजचा AQI 146 वर आला आहे. मुंबईतील देवनार सर्वात प्रदूषित ठिकाण असल्याचे समजत आहे. देवनार 214, शिवाजी नगर 208, नेव्ही नगर कुलाबा 201, बीकेसी 199, मालाड पश्चिम 210, खेरवाडी 168, शिवडी 139, कांदिवली 174, चेंबूर 167, अंधेरी चकाला 192, घाटकोपर 168 आहे. यातच आता छठपूजेचा सणाची लगबग सुरु झाली आहे. मुंबईत छठपूजेवरुन वातावरण तापले आहे. छठपूजेच्या सणासाठी आता मुंबईतील लोकलच्या उद्घोषणा थांबवून छठपूजेची गाणी वाजवण्याचे आदेश सरकारने दिले आहे.
Published On - Nov 12,2026 8:27 AM
