AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी तिजोरीला मोठा दिलासा! 10 नोव्हेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष करातून 14.42 लाख कोटींची कमाई; कोणत्या करामुळे वाढ?

भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन हे ११.७६ टक्क्यांनी वाढून १४.४२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १४.०२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सरकारी तिजोरीला मोठा दिलासा! 10 नोव्हेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष करातून 14.42 लाख कोटींची कमाई; कोणत्या करामुळे वाढ?
Net direct tax collection grows
| Updated on: Nov 12, 2026 | 9:00 AM
Share

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात यंदा चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे सरकारी तिजोरीला फायदा झाला आहे. 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत सरकारच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 11.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा 14.42 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, एकूण प्रत्यक्ष कर संकलनातही 14.02 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी महसुलाला मोठा आधार मिळाला आहे. आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 10 नोव्हेंबर या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 14.42 लाख कोटी रुपये इतका झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत सरकारच्या तिजोरीत 12.90 लाख कोटी रुपये जमा झाले होते.

दरम्यान, रिफंड वजा करण्यापूर्वीचे एकूण म्हणजेच ग्रॉस डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 14.02 टक्क्यांनी वाढून 17.50 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी याच काळात हे संकलन 15.35 लाख कोटी रुपये होते.

कोणत्या करातून महसुलात मोठी वाढ?

सरकारच्या तिजोरी मध्ये वेगवगेळ्या माध्यमातून कर जमा होतात. यंदा कॉर्पोरेट कर संकलनाने दमदार कामगिरी केली आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबरपर्यंत 5.36 लाख कोटी रुपये असलेले निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन यंदा वाढून 6.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच यात तब्बल 17.84 टक्क्यांची वाढ झाली आहे.

नॉन-कॉर्पोरेट करातही वाढ?

दुसरीकडे, वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), भागीदारी संस्था आणि इतर घटकांकडून जमा होणाऱ्या नॉन-कॉर्पोरेट करातही वाढ झाली आहे. या प्रकारातील निव्वळ कर संकलन 7.18 लाख कोटी रुपयांवरून 7.56 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या वाढीचे प्रमाण 5.30 टक्के आहे.

कोणत्या टॅक्समध्ये 51 टक्क्यांहून अधिक वाढ?

शेअर बाजारातील व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मधून मिळणाऱ्या महसुलात यंदा मोठी वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत STT मधून 35,681.88 कोटी रुपये जमा झाले होते. यंदा हा आकडा तब्बल 54,077.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच STT संकलनात 51.56 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

कर परताव्याच्या रकमेतही वाढ!

सरकारकडून करदात्यांना दिल्या जाणाऱ्या रिफंडच्या रकमेतही वाढ झाली आहे. 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत एकूण 3.08 लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर परतावे देण्यात आले आहेत. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत ही रक्कम 2.45 लाख कोटी रुपये होती. यंदा रिफंडमध्ये जवळपास 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सरकारसमोर किती कर संकलनाचे लक्ष्य?

चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने प्रत्यक्ष करातून 26.97 लाख कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये जमा झालेल्या 23.40 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे लक्ष्य सुमारे 15 टक्क्यांनी अधिक आहे. आतापर्यंत या उद्दिष्टापैकी 14.42 लाख कोटी रुपये सरकारने जमा केले आहेत. म्हणजेच वार्षिक लक्ष्याच्या जवळपास 53 टक्के उद्दिष्ट 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाले आहे.

प्रत्यक्ष कर संकलनातील ही वाढ सरकारच्या महसुलाच्या दृष्टीने सकारात्मक मानली जात आहे. विशेषतः कॉर्पोरेट कर आणि शेअर बाजारातील व्यवहारांवरील करातून मिळालेला वाढीव महसूल सरकारी आर्थिक स्थितीला बळ देणारा ठरू शकतो.

Follow Us
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!