Video | जिम सुरु झाल्याचा अत्यानंद, महिलेने साडी नेसून ‘झिंगाट’च्या तालावर केले वर्कआऊट! पाहा व्हिडीओ

| Updated on: Jun 15, 2021 | 5:15 PM

साडी नेसून ‘झिंगाट’ गाण्यावर जोरदार कसरत करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या महिलेच खूप कौतुक करण्यात येत आहे. साडी नेसून जिम वर्क आऊट करणाऱ्या या महिलेने अनेकांना व्यायामाची प्रेरणा दिली आहे.

Video | जिम सुरु झाल्याचा अत्यानंद, महिलेने साडी नेसून ‘झिंगाट’च्या तालावर केले वर्कआऊट! पाहा व्हिडीओ
डॉ. शर्वरी इनामदार
Follow us on

पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार मजला आहे. यातच कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊन अंतर्गत पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. यात अत्यावश्यक सेवा वगळता, मॉल्स, जिम, दुकानं आणि इतर ठिकाण पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोना काहीसा आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात जिम देखील सुरु करण्यात आल्या आहेत. याचाच आनंद व्यक्त करत एका महिलेने चक्क साडी नेसून कसरत केली आहे (Dr Sharvari Inamdar Gym workout in saree on zigaat song goes viral on internet).

साडी नेसून ‘झिंगाट’ गाण्यावर जोरदार कसरत करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या महिलेच खूप कौतुक करण्यात येत आहे. साडी नेसून जिम वर्क आऊट करणाऱ्या या महिलेने अनेकांना व्यायामाची प्रेरणा दिली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

कोण आहे ‘ही’ महिला?

जिममध्ये साडी नेसून ‘झिंगाट’ गाण्यावर व्यायाम, पुशअप्स करणाऱ्या या महिला पुण्यातील असून, त्या आहारतज्ज्ञ आहेत. डॉ. शर्वरी इनामदार असे त्यांचे नाव असून, त्या आयुर्वेद एम.डी. आहेत. डॉ. शर्वरी इनामदार या नेहमीच जिममधील व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, त्यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘जिम सुरु झाल्याचा आनंद..’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पुण्यात दिलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध (Pune Unlock) सोमवारपासून (14 जून) उठवण्यात आले आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी (Pune Unlock Guidelines) केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील जिम, मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही 100 टक्के क्षमतेने सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(Dr Sharvari Inamdar Gym workout in saree on zigaat song goes viral on internet)

हेही वाचा :

Video : इवल्याशा पक्ष्याचा गोड चिवचिवाट, खट्याळपणे म्हणतोय I Love You, व्हिडीओ पाहाच

Photo : मिझोरमच्या डंपा रिझर्व्हमध्ये 7 वर्षानंतर वाघोबाचे दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल