“रस्ता चुकू नये म्हणून GPS लावलं आणि…” धक्कादायक! घटना व्हायरल

| Updated on: Oct 09, 2022 | 4:15 PM

उशीर झाल्यामुळे त्याने जीपीएस नकाशाचा आधार घेतला. पण गुगल मॅपने त्याला चुकीच्या मार्गावर नेले

रस्ता चुकू नये म्हणून GPS लावलं आणि... धक्कादायक! घटना व्हायरल
Wrong gps
Image Credit source: Social Media
Follow us on

अज्ञात मार्गावरून गाडी चालवताना लोक आजच्या काळात अनेकदा ऑनलाइन मॅपचा वापर करतात. मॅप्स बऱ्याचदा लोकांना योग्य मार्गावर घेऊन जातात. पण काही वेळा ऑनलाइन मॅप्स चुकतात सुद्धा, याचा अनुभव तुम्हालाही आलाच असेल. चुकीच्या जीपीएस नकाशामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना अमेरिकेतील कॅरोलिना मधील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिकोरी शहरात गेल्या आठवड्यात एका बर्थडे पार्टीतून फिलिप पॅक्सन नावाचा एक व्यक्ती घरी परतत होता.

उशीर झाल्यामुळे त्याने जीपीएस नकाशाचा आधार घेतला. पण गुगल मॅपने त्याला चुकीच्या मार्गावर नेले आणि त्याची गाडी एका तुटलेल्या पुलावर जाऊन पोहोचली.

आपली गाडी चुकीच्या पुलावर जात असल्याची माहिती नसल्याने जीपीएस मॅप नुसार जात त्याने गाडी पुलावरून वर नेली. पुलावर गाडी चढताच ती पडून आदळली. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

नेव्हिगेशन सिस्टिमने त्या माणसाला नदीकडे जाणाऱ्या, तुटलेल्या पुलाकडे जाण्याचा रस्ता दाखवला, असं सांगण्यात येतंय.

रिपोर्ट्सनुसार सुमारे एक दशकापूर्वी हा पूल तुटला होता आणि त्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली गेली नव्हती. दु:खद गोष्ट म्हणजे हा माणूस आपल्याच मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवरून परतत होता.

तो माणूस गाडी चालवत होता. पावसाळ्यातली रात्र रस्ते समजत नसल्याने त्याने जीपीएस चालू केलं. नेव्हिगेशन सिस्टमने त्याला चुकीच्या दिशेने वळविले.