वयस्कर जोडप्याचा टॅटू रेकॉर्ड, 2000 तास एका जागी होते बसून, फोटो करतील हैराण!

या ज्येष्ठ जोडप्याच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून हे करत आहेत. इतकंच काय तर टॅटूसंदर्भात त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

वयस्कर जोडप्याचा टॅटू रेकॉर्ड, 2000 तास एका जागी होते बसून, फोटो करतील हैराण!
world record of tattoo
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 18, 2023 | 12:01 PM

अलीकडच्या काळात टॅटूचा ट्रेंड वाढला आहे, असं लोकांना वाटतं. पण एखाद्या ज्येष्ठ जोडप्याला जर तुम्ही भेटलात किंवा तुम्ही त्यांना पाहिलं तर तुमचा हा गैरसमज सुद्धा दूर होईल. या ज्येष्ठ जोडप्याच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून हे करत आहेत. इतकंच काय तर टॅटूसंदर्भात त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्यांच्या शरीराच्या 90 टक्के भागात टॅटू आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, हेल्मके 81 आणि शार्लोट गुटेनबर्ग 74 अशी त्यांची नावे आहेत. त्याच्या नावावर एक अनोखा विश्वविक्रम आहे. ज्यात त्याने 2000 तास खुर्चीत बसून आपले संपूर्ण शरीर टॅटूने भरण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. फक्त शार्लोटचा चेहरा आणि तिच्या हातांचा काही भाग टॅटूने भरलेला नाही, उर्वरित संपूर्ण शरीरावर टॅटू आहे.

ती म्हणाली, “मी स्वत:ला एक फिरती आर्ट गॅलरी समजते. काही लोक कला विकत घेऊन भिंतीवर टांगतात. याच कला माझ्या अंगावर असतात आणि याचाच मला अभिमान आहे. शार्लोट गुटेनबर्ग आणि तिचा पती चार्ल्स हेल्मके यांनी आपला टॅटूचा छंद जोपासण्यासाठी आणि त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या रंगांच्या डिझाइनसाठी सुमारे 2000 तास खुर्चीत घालवले आहेत.

Tattoo world record by elder couple

रिपोर्टनुसार, शार्लोटने वयाच्या 57 व्या वर्षी पहिला टॅटू काढला होता. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे. आता वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे शरीर 98 टक्क्यांहून अधिक टॅटूने भरले आहे. पण तरीही तिला पूर्ण समाधान वाटते. विशेष म्हणजे शार्लोटला जो जीवनसाथी मिळाला तो देखील टॅटू प्रेमी होता. चार्ल्सने वयाच्या 81 व्या वर्षी आपल्या शरीराचा 97 टक्क्यांहून अधिक भाग टॅटूने व्यापला आहे. चार्ल्सने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला टॅटू काढला होता.