AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर उभं राहून हत्ती माणसाकडे मागतोय मदत, हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का?

हत्ती हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक असून वेळोवेळी त्याचे पुरावेही ते देताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर हत्तीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांची मने जिंकली आहेत.

रस्त्यावर उभं राहून हत्ती माणसाकडे मागतोय मदत, हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का?
Elephant videoImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 16, 2023 | 6:04 PM
Share

मुंबई: प्राण्यांमध्येही माणुसकी असते. ते इतरांना ही मदत करताना दिसतात आणि गरज पडल्यास इतरांकडूनही मदत मागतात. इतर प्राणी वगळता हत्तींमध्ये हे अनेकदा दिसून येते. हत्ती हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक असून वेळोवेळी त्याचे पुरावेही ते देताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर हत्तीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांची मने जिंकली आहेत. खरं तर या व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या लहान मुलाला संकटात बघतो आणि लोकांकडे मदत मागायला बाहेर पडतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्ती रस्त्यावर उभा राहून एका दुचाकीस्वाराकडे मदत मागत आहे. ती आपल्या सोंडेने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र त्या व्यक्तीला हत्ती आपल्यावर हल्ला करतोय की काय असं वाटतं म्हणून तो दुचाकीवरून वेगाने निघतो. मात्र यानंतर थोड्याच वेळात हत्ती जंगलात गेल्यावर काही लोक हत्तीच्या मुलाला मदत करण्यासाठी तिथे येतात, यानंतर लोक खड्ड्यात अडकलेल्या हत्तीच्या मुलाला वर आणण्याचा मार्ग बनवतात, जेणेकरून तो आरामात वर चढतो आणि मग आपल्या आईकडे धावतो.

अशी माणुसकी क्वचितच पाहायला मिळते. जिथे माणसं कुणाला तरी संकटात बघतात आणि त्याच स्थितीत त्यांना सोडून जातात, तिथे माणसं हत्तीला मदत करताना दिसतात. हा व्हिडिओ खरोखरच हृदयस्पर्शी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ @cctvidiots नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हत्तीच्या मुलाला वाचवणारी माणसे’.

52 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 35 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओने हृदयाला स्पर्श केला, असं काही जण म्हणत आहेत, तर काही जण हत्तीच्या मुलाचा जीव वाचवून खूप चांगलं काम केल्याचं सांगत आहेत.

Follow Us
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...