या माणसाने केला गिनीज रेकॉर्ड, एका मिनिटात वाजविल्या इतक्या टाळ्या

त्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही पोस्ट करण्यात आला आहे.

या माणसाने केला गिनीज रेकॉर्ड, एका मिनिटात वाजविल्या इतक्या टाळ्या
clapping record
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 06, 2022 | 5:24 PM

तुम्ही कधी विचार केला आहे का की एका मिनिटात तुम्ही किती टाळ्या वाजवू शकता? एका मुलाने हजाराचा टप्पा पार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. या मुलाने एका मिनिटात ११४० टाळ्या वाजवल्या. याचाच अर्थ एका सेकंदात १९ टाळ्या वाजवण्याचा विक्रम या मुलाने केलाय.

त्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही पोस्ट करण्यात आला आहे. या मुलाने हा पराक्रम कसा केला आहे, हेही यातून दिसून येते.

डाल्टन मेयर असं या मुलाचं नाव असून तो अमेरिकेचा आहे. या मुलाने एका मिनिटात ११४० टाळ्या वाजवल्यात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाल्टन मेयरने हा रेकॉर्ड बनवण्यासाठी मनगटी वाल्या क्लॅपिंग तंत्राचा वापर केला. या तंत्रात मनगट आणि बोटांचा वापर करून दुसऱ्या हाताच्या तळहातावर टाळी वाजवावी लागते.

या मुलाने मार्च महिन्यातच हा अनोखा विश्वविक्रम केला होता, त्याला आता मान्यता मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. या विक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली असून या विक्रमाचा समावेश गिनीज बुकात करण्यात आला आहे.

याआधी एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम एली बिशप यांच्या नावावर होता, त्यांनी एका मिनिटात 1103 वेळा टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला होता.