VIDEO : अक्षय कुमारच्या गाण्यावर वडिलांनी मुलीसोबत केला जबरदस्त डान्स, इंटरनेटवर खळबळ

वडिलांनी आणि मुलीने सुपर डान्स केला आहे. त्यामुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

VIDEO : अक्षय कुमारच्या गाण्यावर वडिलांनी मुलीसोबत केला जबरदस्त डान्स, इंटरनेटवर खळबळ
अक्षय कुमारच्या चित्रपटातील हे गाण आहे
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 10, 2023 | 2:49 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) डान्सचे अनेक दिवाने पाहायला मिळतात. त्यापैकी चांगले डान्स करणारे अधिक व्हायरल (viral video) झाले आहे. विशेष म्हणजे बापाचा आणि मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. लोकांनी त्यावर कमेंट (comment) करुन शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अक्षय कुमारच्या चित्रपटातील हे गाण आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे, गरम मसाला आणि त्या गाण्याचे बोल आहेत’अदा आय हाय अदा’… या गाण्यावर वडिलांनी आणि मुलीने सुपर डान्स केला आहे. त्यामुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर nandinii_5257 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. वडील आणि मुलीने त्या व्हिडीओमध्ये मजा केल्याचे दिसत आहे. वडीलांनी ब्लू जीन्स आणि मुलीने ऑरेंज टी-शर्ट सुपर डान्स केला आहे.