वडील मुलाला रेल्वे स्टेशनवर सोडायला आले, व्हिडीओ बघून सगळेच भावूक!

असाच एक व्हिडिओ आजकाल आपल्याला पाहायला मिळाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांची नक्कीच आठवण येईल.

वडील मुलाला रेल्वे स्टेशनवर सोडायला आले, व्हिडीओ बघून सगळेच भावूक!
Father dropping son off
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 26, 2023 | 3:21 PM

आजच्या काळात सोशल मीडिया हे युजर्ससाठी एक व्यासपीठ बनले आहे. जिथे तुम्हाला अनेकदा विविध गोष्टी पाहायला मिळतात. जे पाहून लोक हसतात, असे काही आश्चर्यकारक व्हिडिओही आहेत. पण जेव्हा जेव्हा पालकांशी संबंधित एखादा व्हिडिओ आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आपल्या पालकांची आठवण येते. असाच एक व्हिडिओ आजकाल आपल्याला पाहायला मिळाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांची नक्कीच आठवण येईल.

मुलं मोठी झाल्यावर नोकरी आणि शिक्षणासाठी इतर शहरात जातात, त्यामुळे अनेकदा असं दिसून येतं की, वडील रेल्वे स्टेशन सोडायला येतात. वडिलांची एक सवय खूप कॉमन असते, ट्रेन सुटेपर्यंत ते ट्रेनकडे बघत राहतात. त्यांची स्वतःची एक पद्धत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जिथे एक बाप आपल्या मुलाला स्टेशनवर सोडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाप आपल्या मुलाला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येतो आणि ट्रेन सुटेपर्यंत ते ट्रेनकडे बघत राहतो.

जेव्हा ट्रेन सुरू होते तेव्हा वडील देखील त्याच्यासोबत चालतात आणि ते ट्रेनसह आपला वेग वाढवू लागतात. ट्रेन जाईपर्यंत ते चालत राहतात. काही सेकंदाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आपल्या वडिलांची आठवण येत आहे. युजर्स हा व्हिडिओ तर पाहत आहेतच, पण आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत ही व्हिडीओ शेअर करत आहेत.