AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे… संजय राऊतांची थेट टीका, म्हणाले, भाजपा…

29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असून जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यानच आता भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे... संजय राऊतांची थेट टीका, म्हणाले, भाजपा...
Sanjay Raut
| Updated on: Dec 30, 2025 | 10:43 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर असून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. राज्यातील महापालिका निवडणुका मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती म्हणून लढणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच युती म्हणून या निवडणुका लढत आहेत. नुकताच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊतांनी मोठे विधान केले. संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपाला जागा देत होती. आता काय पाळी आलीये… अमित शहांची स्वत: शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहवं लागतं. त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. ही यांची शिवसेना आहे. यापूर्वी 60 वर्षांच्या इतिहासामध्ये शिवसेना कधीही कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही.

पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वत:ला शिवसेना वगैरे म्हणून घेतात. ते युती व्हावीत म्हणून ते त्यांचे मालक अमित शहा यांच्या दारात गेले आणि आता त्यांना भारतीय जनता पक्षाने जागा दिल्या, लढा म्हणून. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजीरवाणे आहे. आम्ही शिवसेना आहोत.. आम्ही सन्मानाने आघाडीत गेलो आहोत. 140 च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत, हे आतापर्यंतचे चित्र आहे.

राज ठाकरे यांचाही पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढत आहे. एनसीपीला आम्ही जागा देत आहोत. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी.. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढत आहे.. आता याचा विचार जनता नक्की करेल. मला खूप आर्श्चय वाटले आणि वाईटही वाटले. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पार्टीने फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपाला जागा देत होती.

पुढे बोलताना संजय राऊतांनी म्हटले की, बीजेपीला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. तिथे एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवतायत. हे मराठी माणसाचे दुर्देव आहे. ज्या ज्यावेळी भाजपाने अशी भूमिका घेतली, त्यावेळी शिवसेना स्वाभिमानाने बाजूला झाली, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?