Video : फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवासाची सवय, थर्ड एसीत मुलाची कुरकुर; वडिलांनी जनरल डब्यात नेऊन शिकवला आयुष्याचा मोठा धडा!

मुलाला कायम फर्स्ट एसीने प्रवास करायची सवय पण ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने थर्ड एसीने प्रवास करावा लागला तो मुलाला आवडला नाही. मुलगा कटकट करू लागला. मग त्याच्या वडिलांनी अशी काय भन्नाट कल्पना केली. ज्यामुळे त्यांच्या पालकत्वाचं सगळीकडे कौतुक झालं.

Video : फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवासाची सवय, थर्ड एसीत मुलाची कुरकुर; वडिलांनी जनरल डब्यात नेऊन शिकवला आयुष्याचा मोठा धडा!
viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 17, 2026 | 9:00 PM

मुलांना चांगल्या सुविधा द्यायच्या त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू द्यायची नाही. असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. पण याच सुविधांची सवय झाली की कधी कधी मुलांना आजुबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही.अशाच एका वडिलांनी आपल्या मुलाला समज देण्यासाठी भन्नाट मार्ग निवडला. ट्रेनमध्ये कायम एसीने प्रवास करणारा हा मुलगा, त्याच्या वडिलांनी थर्ड एसीची तिकिटं बुक केली. त्या डब्ब्यातील सोयी सुविधा त्या मुलाला आवडल्या नाहीत म्हणून तो तक्रार करू लागला. पण यावर वडिलांनी न रागवता मुलाला समज देण्यासाठी एक भन्नाट मार्ग निवडला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिवाळीच्या काळात त्यांना कुटुंबासह अचानक प्रवास करायचा होता.मात्र ऐनवेळी दिवाळीत फर्स्ट एसी किंवा सेंकड एसीचं तिकिट न मिळाल्याने त्यांना थर्ड एसीचे तिकिट मिळाले. त्यांच्या मुलाला मात्र या प्रवासाची सवय नव्हती. तो नेहमी फर्स्ट किंवा सेकंड एसीने प्रवास करत असल्यामुळे थर्ड एसीतील सुविधा त्याला आवडल्या नाहीत. त्यामुळे तो तक्रार करू लागला.

Loading...

 

 

मुलाची तक्रार ऐकल्यानंतर वडिलांनी त्याला ओरडण्याऐवजी एक भन्नाट आयडिया केली. ते मुलाला घेऊन थेट जनरल डब्यात गेले. व्हिडिओमध्ये जनरल डब्यात प्रचंड गर्दी दिसते. काही प्रवासी सीटवर , काही जमिनीवर, तर काही डब्यातील येण्या जाण्याच्या जागेत बसलेले किंवा झोपलेले दिसतात. मुलगा या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना दिसतो. 3AC मधील प्रवासाबद्दल तक्रार करणाऱया मुलाला जनरल डब्यातून लोक कसे प्रवास करतात आणि आपण कसा प्रवास करतोय यातला फरक समजला. हा व्हिडिओ त्या वडिलांनी म्हणजेच नवीन गु्प्ता यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा अनुभव देण्यामागचा उद्देशही नवीन यांनी स्पष्ट केला. प्रत्येक माणूस समान आहे आणि प्रत्येकाला आदर मिळायला हवा, हे मुलाला समजावून सांगायचं होतं. असं त्यांनी म्हटलं. आपल्याला नेहमी आरामदायी सुविधा मिळतीलच असं नाही. काही वेळा परिस्थितीनुसार तडजोड करावी लागते. जगात मिळतीलच असं नाही काही वेळा परिस्थितीनुसार तडजोड करावी लागते. जगात प्रत्येक व्यक्ती कोणापेक्षा तरी श्रीमंत असते आणि कोणापेक्षा तरी गरीब असते. त्यामुळे कोणाबद्दलही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असल्याची भावना मनात ठेवू नये.असंही त्यांनी मुलाला सांगितले.

नवीन यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या पालकत्वाच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे. मुलांना अशीच शिकवण द्यायला हवी. तर काहींनी पालकत्वाचं उत्तम उहाहरण अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर लहानपणापासून मुलांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेच असल्याचं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us