AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाच्या जन्मदाखल्यासाठी आता खेटे मारायची गरज नाही, आता येथे तीन दिवसात मिळणार जन्मप्रमाणपत्र

बाळाच्या जन्मदाखल्यासाठी आता पालिकेच्या विभाग कार्यालयात तुम्हाला यापुढे खेटे घालण्याची गरज नाही. आता झटकीपट संबंधित रुग्णालयात जन्मदाखला मिळण्याची सोय होणार आहे.

बाळाच्या जन्मदाखल्यासाठी आता खेटे मारायची गरज नाही, आता येथे तीन दिवसात मिळणार जन्मप्रमाणपत्र
birth certificate
| Updated on: Nov 17, 2026 | 8:57 PM
Share

नवजात बाळाचा जन्मदाखला काढणे म्हणजे अनेक दिवसांचे काम असते. त्यासाठी नजिकच्या पालिकेच्या विभाग कार्यालयात खेटे मारावे लागतात. मात्र, आता जन्मदाखला देण्याच्या या पुर्वापार प्रथेत बदल होणार असून बाळाचा जन्मदाखला जेथे बाळाचा जन्म झाला त्या रुग्णालयातूनच मिळणार आहे. जन्मानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी जन्मदाखल देण्यात यावा अशी योजना आकारास येत आहे.

नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर पालकांना आपल्या बाळाच्या शाळा प्रवेशासह अनेक सरकारी कामांसाठी बाळाच्या जन्मदाखल्याची गरज असते. मात्र, यासाठी ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला असेल त्या हद्दीतील पालिका विभाग कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्यानंतर साधारण महिने, दीड महिन्यात तुम्हाला बाळाचा जन्मदाखला हातात पडतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला त्या कार्यालयात अनेकदा खेटे मारावे लागतात. मात्र, आता हे दिवस संपले आहेत. आता बाळाचा जन्मदाखल थेट त्या रुग्णालयात देण्याची व्यवस्था करण्यात आली असून अवघ्या तीन दिवसात बाळाचा जन्मदाखला मिळणार आहे.

आता रुग्णालयातूनच मिळणार नवजात बालकांचा जन्मदाखला!

जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांत तुमच्या बाळाचे जन्मप्रमाणपत्र आता मिळणार आहे. या आता नजिकच्या पालिका कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. सध्या चार प्रमुख आणि १६ उपनगरीय रुग्णालयांत ही सुविधा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत.नोंदणीसाठी रुग्णालयांना स्वतंत्र लॉग इन आयडी देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता आपल्या बाळाच्या जन्मदाखल्यासाठी पालकांना स्वतंत्र अर्ज किंवा पाठपुरावा करण्याची गरज नाही.राज्य सरकारच्या माध्यमातून भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून जन्म नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार.

Follow Us
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया