AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar: सावधान! आजीबाईंना लागलं रिल्सचं वेड, मोबाईल काढताच 15 दिवस रुग्णालयात, तिथं जे घडलं…

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरमध्ये एका 75 वर्षांच्या आजींना मोबाईलचे इतके भयंकर व्यसन जडले की त्यांन थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...

Chhatrapati Sambhajinagar: सावधान! आजीबाईंना लागलं रिल्सचं वेड, मोबाईल काढताच 15 दिवस रुग्णालयात, तिथं जे घडलं...
Image Credit source: AI Image
| Updated on: Nov 17, 2026 | 8:46 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी:  सध्या सर्वांनाच मोबाईल पाहण्याचे व्यसन जडले आहे. वय आठ असो किंवा 80 सर्वचजण तासनतास मोबाईल पाहण्यात व्यस्त असतात. मोबाईलचे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात त्यामुळे चिमुकल्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे, असा सल्ला दिला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरमध्ये एका 75 वर्षांच्या आजींना मोबाईलचे इतके भयंकर व्यसन जडले की त्यांन थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर…

75 वर्षांच्या आजीला रिल्सचा नाद,  15 दिवस रुग्णालयात उपचार! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन आता केवळ तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ७५ वर्षीय आजीबाई इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याच्या इतक्या आहारी गेल्या की, त्यांना जेवण, पाणी आणि दैनंदिन व्यवहारांचेही भान राहिले नाही.

कुटुंबीयांनी मोबाईल काढून घेतल्यानंतर त्या आक्रमक झाल्या. अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. विशेष म्हणजे उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातील पाच रुग्णांचे मोबाईल चोरून स्वतःच्या पिशवीत ठेवल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले. त्यामुळे मोबाईलचे व्यसन कोणत्याही वयात गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

डॉक्टरांनी काय सांगितलं?

आजकाल वृद्ध लोकांची जास्त काळजी घेतली पाहिजे. अनेकदा दुर्लक्ष केल्याने त्यांचे स्वास्थ बिघडत आहे. आधी आपण पाहायचो की लहान मुलांमध्ये मोबाईल पाहायचे प्रमाण वाढत होते. आता आपण वृद्ध लोकांमध्येही मोबाईलचे व्यसन पाहतोय. मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे, मेंदूला ताण येणे, यामुळे डिप्रेशनसारखी लक्षणे दिसून येतात, असे मनोविकारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी सांगितले आहे.

तसेच आपण वृद्ध लोकांचीही काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. वृद्ध लोकांनाही एकटेपणा जाणवू नये त्यासाठी आवश्यक ती पाऊले आपण उचलली पाहिजेत, अशा पद्धतीने आपण त्यांचे मोबाईलचे व्यसन कमी करु शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Follow Us
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया