एका व्यक्तीने मुलीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा चढला पारा, विमानात गोंधळ! व्हिडीओ व्हायरल

कधी विमानात मिळणाऱ्या जेवणावरून कुणी गदारोळ करतो, तर कधी प्रवासी आपापसात भांडतात. अनेकदा सीटवरून प्रवासी आपापसात भांडतानाही दिसतात. याशिवाय भांडणाची काही विचित्र कारणेही आहेत, जसे की विमानात प्रवाशाने लघवी करणे. आता हा व्हिडिओ बघा.

एका व्यक्तीने मुलीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा चढला पारा, विमानात गोंधळ! व्हिडीओ व्हायरल
Fight in airline
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 04, 2023 | 5:41 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये गोंधळाचे अनेक प्रकार सुरू आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरही लोक विमानात गोंधळ घालत आहेत. कधी विमानात मिळणाऱ्या जेवणावरून कुणी गदारोळ करतो, तर कधी प्रवासी आपापसात भांडतात. अनेकदा सीटवरून प्रवासी आपापसात भांडतानाही दिसतात. याशिवाय भांडणाची काही विचित्र कारणेही आहेत, जसे की विमानात प्रवाशाने लघवी करणे. आता हा व्हिडिओ बघा. भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात प्रवासी विमानात गोंधळ घालताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जोरात ओरडताना दिसत आहे, तर फ्लाइट अटेंडंट त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही घटना 25 जून रोजी मुंबई-देहराडून विमानात घडली होती. या व्यक्तीची मुलगीही विमानात प्रवास करत होती आणि दुसऱ्या प्रवाशाने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला. हे ऐकून मुलगी सुद्धा जोरजोरात ओरडू लागले. “तू मला स्पर्श करण्याची हिंमत कशी केलीस?”. हे प्रकरण विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाचे आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 86 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलं, ‘ माणुसकी कुठे गेली आहे? अजिबात लाज वाटत नाही.” तर आणखी एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिलं आहे की, ‘विमानात जाणारे लोक इंग्रजीतच भांडत असतात’.