Fighter plane चा आवाज ऐकून कुत्र्याची प्रतिक्रिया! व्हिडीओ व्हायरल!

या विचित्र आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी घाबरलेल्या लोकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अनेकांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेजही शेअर केले, ज्यात मोठा आवाज कैद झाला. दरम्यान, अमेरिकन हवाई दलाने आणखी धक्कादायक अशी एक गोष्ट उघड केली.

Fighter plane चा आवाज ऐकून कुत्र्याची प्रतिक्रिया! व्हिडीओ व्हायरल!
Fighter jet sonic boom sound
| Updated on: Jun 06, 2023 | 4:57 PM

वॉशिंग्टन: सोमवारी वॉशिंग्टन डीसी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने नागरिक घाबरले. आवाज इतका मोठा होता की लोकांची घरं हादरली. मग ते काय होतं. या विचित्र आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी घाबरलेल्या लोकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अनेकांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेजही शेअर केले, ज्यात मोठा आवाज कैद झाला. दरम्यान, अमेरिकन हवाई दलाने आणखी धक्कादायक अशी एक गोष्ट उघड केली.

वॉशिंग्टन डीसी आणि उत्तर व्हर्जिनियावरून एक अनोळखी खासगी विमान हवाई हद्दीचे उल्लंघन करून उड्डाण करत होते. खासगी जेट रेडिओ सिग्नलला प्रतिसाद देत नसल्याने F-16 ला सुपरसॉनिक मंजुरी देण्यात आली. यामुळे लोकांना जोरदार गडगडाटाचा (सोनिक बूम) आवाज ऐकू आला. ट्विटरवर @goodguyguybrush हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये रॉकेट नावाचा कुत्रा सोनिक बूमवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

जेव्हा विमान ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उडते तेव्हा सोनिक बूम होतो, हा जो व्हिडीओमध्ये आवाज आहे त्याला सोनिक बूम म्हणतात. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा विमान आकाशात झेपावते तेव्हा ते प्रचंड ताकदीने हवेचे रेणू बाजूला ढकलते. यामुळे जोरदार आवाज होतो. आवाजाने त्रास तर होतोच पण सोनिक बूम आपल्या घराचे नुकसान करू शकते. मोठ्या आवाजामुळे खिडक्याही तुटू शकतात.