सुंदर फुलांच्या मधोमध एक कुत्रा लपलेला आहे, दिसला?

ऑप्टिकल भ्रमाचे हे कोडे सोडविण्यासाठी आपले निरीक्षण कौशल्य चांगले असले पाहिजे.

सुंदर फुलांच्या मधोमध एक कुत्रा लपलेला आहे, दिसला?
Find the dog
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 26, 2023 | 6:23 PM

ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. या फोटोंच्या मदतीने तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम करू शकता. काही चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात, तर काहींमध्ये छुप्या चुका शोधाव्या लागतात. काही चित्रे पाहण्याच्या दृष्टिकोनातूनही आपले व्यक्तिमत्त्व शोधता येते. आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचे असेच एक चित्र घेऊन आलो आहोत.

अनेकदा काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर घडतात, तरीही त्या आपल्याला दिसत नाहीत किंवा एखादे चित्र पाहून समजून घेणे फार अवघड असते. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यात दडलेले कोडे शोधण्यात आपण तासन् तास घालवतो. हे चित्रही काहीसे असेच आहे. या फोटोमध्ये या सुंदर फुलांच्या मधोमध एक कुत्रा लपलेला आहे, जो आपल्याला शोधावा लागेल.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात एक सुंदर बाग दिसते, ज्यात डेझीची भरपूर फुले दिसतात. या सुंदर चित्राच्या मधोमध एक कुत्रा लपलेला आहे. त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत.

जर तुम्हाला आतापर्यंत या चित्रात लपलेला कुत्रा सापडला नसेल तर कुत्रा आपल्या मालकासोबत खेळत होता आणि खेळता खेळता तो या बागेत कुठेतरी हरवला. नीट पाहिलं तर कुत्रा अजून फुलांच्या मधोमध पोहोचलेला नाही. चित्राच्या एका कोपऱ्यात तो लपलेला आहे हे आता तुम्हाला समजलं असेलच.

ऑप्टिकल भ्रमाचे हे कोडे सोडविण्यासाठी आपले निरीक्षण कौशल्य चांगले असले पाहिजे.

Here is the dog