या बेडरूम मध्ये एक कुत्रं आहे, दिसणं अवघड! तुम्हाला दिसतंय?

हा कुत्रा प्रचंड लबाड आहे. काळजीपूर्वक पाहिल्यावर तो कुत्रा कुठे आहे हे कळते.

या बेडरूम मध्ये एक कुत्रं आहे, दिसणं अवघड! तुम्हाला दिसतंय?
find the dog
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 17, 2022 | 6:18 PM

असे काही ऑप्टिकल भ्रम आहेत जे समजण्यास बराच वेळ लागतो. यावेळी आम्ही असाच काहीसा ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल भ्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. या फोटोमध्ये बेडरूम दिसत असून त्यात एक कुत्रा लपलेला आहे.

खरे तर हे चित्र म्हणजे लोकांच्या विचारांना आव्हान देणारे आणि निरीक्षण कौशल्याची परीक्षा घेणारे आहे. हे ऑप्टिकल भ्रमाचे चित्र आहे.

ऑप्टिकल इल्यूजनचे सौंदर्य म्हणजे ते थोड्या वेळेसाठी लोकांचे लक्ष वेधून घेते ज्याने मेंदूचा चांगला व्यायाम होतो. या फोटोमध्ये घराची बेडरूम दिसत असून त्यात कुत्रा लपलेला आहे.

या चित्राची गंमत म्हणजे हा कुत्रा अजिबात दिसत नाही. अनेक वस्तू पलंगाच्या आसपास पडलेल्या असल्याचे चित्रात दिसत आहे.

बेडशीट अस्ताव्यस्त पडली असून उशीही अस्ताव्यस्त पडलेली आहे. या सगळ्यामध्ये अचानक तो कुत्रा दिसत नाही. जर तुम्हाला हा कुत्रा सापडला तर तुम्ही खूप हुशार आहात आणि तुमचं निरीक्षण कौशल्य सुद्धा चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

खरं तर या चित्रात हा कुत्रा बेडच्या वरच्या बाजूला बसलेला आहे. नीट निरखून पाहिलं तर ब्लँकेटच्या पुढच्या भागाच्या मधोमध कुत्र्याचा थोडासा चेहरा दिसतो.

find the dog

हा कुत्रा प्रचंड लबाड आहे. काळजीपूर्वक पाहिल्यावर तो कुत्रा कुठे आहे हे कळते.