Video : परदेशी महिलांनी हाताने साफ केला गंगेचा घाट, नेटकरी म्हणाले यांच्याकडून काहीतरी शिका

पर्यटक भारतात फिरायला आले , भारताचं निसर्ग सौंदर्य पाहून विदेशी नागरिकही भारावून गेले. पण तिथेच त्यांना नदीकिनारी कचरा दिसला, मग जे पर्यटक भारताचं कौतुक करतं होते, ते असं काही बोलले आहेत. ज्यामुळे तुम्ही...

Video : परदेशी महिलांनी हाताने साफ केला  गंगेचा घाट, नेटकरी म्हणाले यांच्याकडून  काहीतरी शिका
| Updated on: Nov 23, 2026 | 4:36 PM

परदेशातून भारतात फिरायला आलेले पर्यटक, समोर सुंदर नदी, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि निसर्गाचा मनमोहक देखावा. .. असं दृश्य पाहिलं की कुणालाही तिथे फोटो काढावासा वाटतील. पण उत्तराखंडतील ऋषिकेशमध्ये काही परदेशी महिला पर्यटकांनी मात्र वेगळचं काम केलं. नदिकिनारी फिरायला आलेल्या या महिलांनी तिथे पडलेला प्लास्टिकचा कचरा उचलला आणि थेट सफाईला सुरूवात केली. हातात कचऱ्याच्या पिशव्या आणि हातमोजे घालून त्या नदीकाठ स्वच्छ करताना दिसल्या. त्यांचा हा व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नदीकिनारी फिरताना दिसला कचरा

हा व्हिडिओ ऋषिकेशमधील गंगा घाट परिसरातील असल्याची माहिती आहे. इन्स्टाग्रावर एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुरूवातीला लाल जॅकेट घातलेला एक भारतीय व्यक्ती दिसतो. त्यानंतर कॅमेरा नदीच्या दुसऱ्या बाजूला वळवतो. तिथे काही परदेशी महिला हातात काळ्या रंगाच्या कचऱ्याच्या पिशव्या घेऊन सफाई करताना दिसतात.

Loading...

या महिलांनी हातात हातमोजे घातले आहेत. नदीकाठच्या वाळूत दगडांजवळ आणि परिसरात पडलेले प्लॉस्टिकचे रॅपर आणि इतर कचरा त्या पिशव्यांमध्ये टाकत आहेत. आजूबाजूला सुंदर डोंगर, हिरवळ आणि वाहणारी गंगा दिसत असताना नदीकाठी पडलेला कचरा मात्र या दृश्याला गालबोट लावत होता.

परदेशी नागरिक भारतीयांबद्दल म्हणाले की,

व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनेही या महिलांना सफाई करताना पाहून आश्चर्य व्यक्त केलं. आपणच नदीकिनारी प्लास्टिक आणि इतर कचरा टाकतो, पण परदेशातून आलेल्या महिला तो कचरा उचलत आहेत. असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आपल्या नैसर्गिक आणि आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी बाहेरून आलेल्या पर्यटकांना पुढाकार घ्यावा लागतोय यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकवेळा परदेशी महिलांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी भारतातील पर्यटनस्थळांवर कचरा टाकणाऱ्या लोकांवरही नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी गंगेला पवित्र मानतो. तिची पूजा करतो, मग तिच्या किनाऱ्यावर कचरा टाकतो. असा सवाल उपस्थित केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us