
woman bikini dip in ganga river video viral : उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशमध्ये सध्या एक वाद पेटला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका परदेशी महिला पर्यटकांने बिकनी घालून पवित्र गंगेत स्नान केले. तिने या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक मर्यादेवरून लोक एकमेकांवर तुटून पडले. अनेकांनी वेगवेगळे विचार मांडले.
या व्हिडिओत परदेशी महिला फुलांची माळ गळ्यात घालून गंगा किनाऱ्यावर उभी होती. ती हात जोडून नमस्कार करते. गंगेमध्ये माळ अर्पण केल्यानंतर ती पाण्यात डुबकी मारते. काही लोकांनी तिच्या बिकनीकडे बघू नका. तर तिच्या श्रद्धेकडे बघा असे सुनावले आहे. तर काहींनी तिची श्रद्धा मान्य आहे. पण धार्मिक स्थळी तरी कपड्यांची आणि संस्कृतीची मर्यादा पाळणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
समाज माध्यमांवर वाद पेटला
सोशल मीडियावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोकांच्या मते या परदेशी महिलेचा उद्देश गंगाची पवित्रता आणि तिथले वातावरण दुषित करण्याचा अजिबात नव्हता. या मुलीची मनिषा आणि श्रद्धा चुकीची नाही. पण अनेकांनी तिने बिकनीत अंघोळ करायला नको होती असे म्हटले आहे. काहींनी नकळत का असेना पण तिने जे कृत्य केले त्याचे समर्थन करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
भारतीय परंपरेचा अवमान
काही लोकांनी तिने भारतीय परंपरेचा अवमान केल्याचा दावा केला आहे. तिला धार्मिक स्थळावर कसे कपडे परिधान करावे याची माहिती होती. पण तिने बिकनीचा वापर केल्याचा दावा करण्यात येत आहे. परदेशी आहे, म्हणजे सर्व काही करण्याचा अधिकार मिळतो असे नसल्याची कमेंट युझर्सने दिली आहे. हा भारतीय धार्मिक श्रद्धेचा प्रश्न आहे. जर एखादी भारतीय महिलेने असे केले असते तर तिच्याविरुद्ध रान उठले असते. पण ही महिला परदेशी असल्याने लोक चुप बसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तर काही युझर्सनी महिलांपेक्षा पुरूषांच्या पोशाखाकडे पण पाहा, असा सल्ला दिला आहे. अनेक जण गंगेत केवळ एका लंगोटीवर स्नान करतात. तेव्हा तुमच्या धार्मिक श्रद्धांना ठेच पोहचत नाही का असा सवाल कमेंटमध्ये करण्यात आला आहे. अंडरवेअरवर पुरूष अंघोळ करतात. गंगेत पोहतात. डुबकी मारतात, तेव्हा असा प्रश्न का विचारला जात नाही. गंगेत सांडपाणी सोडले जाते, तेव्हा श्रद्धा कशी पवित्र राहते असे अनेक सवाल या निमित्ताने विचारले जात आहे.