प्रत्येकजण आपल्या मित्राच्या लग्नात स्पेशल काहीतरी करण्यासाठी भन्नाट प्लान करत असतात. असाच प्लान शिकागोमधील दोन मित्रानी त्यांच्या मित्राच्या लग्नात केला आहे. ते दोघे जण मित्राच्या लग्नात चक्क साडी नेसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
त्यांनी फक्त साडीच नाही तर भारतीय महिलांच्या पोशाखा प्रमाणे त्यांनी कपाळावर टिकली देखील लावली आहे. जेव्हा हे सर्व त्याच्या मित्रांनी पाहिले तेव्हा त्याला हसू अनावर झाले. त्यानंतर मित्राने त्यांना जाऊन मिठी मारली.
या व्हिडीओमध्ये एक महिला त्या दोन मुलांना साडी नेसण्यास मदत करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर paraagonfilms नावाच्या अकाऊटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यत 70 हजार दोनशे लोकांनी पाहिला आहे.