अरे कोण आहे ही पिवळ्या लेहंग्या मधली मुलगी? का म्हणून व्हायरल होतीये?

व्हायरल होत असलेला फोटो 21 फेब्रुवारीचा आहे. हा फोटो एका समारंभात घेण्यात आला होता. लोकांच्या कमेंट्स आणि मतांवर नैना म्हणाली की, "लोकांचं मन खूप मोठं आहे. एकाकडून मदत मागितली तर 1000 येतील."

अरे कोण आहे ही पिवळ्या लेहंग्या मधली मुलगी? का म्हणून व्हायरल होतीये?
yellow lehnga girl
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 16, 2023 | 3:34 PM

ट्विटरवर एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तेरे नैना नावाच्या ट्विटर हँडलवरून पिवळ्या रंगाच्या लेहंगामधील एका मुलीच्या फोटोला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा फोटो 5 मार्च रोजी पोस्ट करण्यात आला होता. फोटोमध्ये युजरने घागऱ्यामधला फोटो पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कोणीतरी फोटोग्राफर आणि लोकांना फोटोतून काढून टाका.” हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचं नाव नैना अग्रवाल असून ती पिवळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये आहे. या फोटोमध्ये तिची पाठ दिसतीये. या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा पिवळा घागरा घातलेल्या मुलीचा फोटो लोकांना प्रचंड आवडलाय.

नैना मूळची महाराष्ट्राची असून सध्या ती राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये वास्तव्यास आहे. नैना मार्केटिंगचं काम करते. नैनाच्या म्हणण्यानुसार, व्हायरल होत असलेला फोटो 21 फेब्रुवारीचा आहे. हा फोटो एका समारंभात घेण्यात आला होता. लोकांच्या कमेंट्स आणि मतांवर नैना म्हणाली की, “लोकांचं मन खूप मोठं आहे. एकाकडून मदत मागितली तर 1000 येतील.”

असे काही वापरकर्ते होते ज्यांनी नैनाची विनंती अत्यंत गांभीर्याने घेतली आणि तिला मदत म्हणून फोटोग्राफरला उडवून लावले. पण सगळ्यात हा फोटोच प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी इतकी मदत कदाचितच कुणाला केली असेल.