Video : सायकल घेऊन उंच डोंगरावरून उडी, काळजाचा ठोका चुकवणारा तरूणीचा स्टंट, पाहा व्हीडिओ….

एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी असल्याचं दिसून येतं. त्याचवेळी तिथे एक मुलगी उभी असलेली दिसते. मग सायकलवरून एक मुलगी येते आणि टेकडीवरून उडी मारते. हे दृश्य खूपच रोमांचक आहे.

Video : सायकल घेऊन उंच डोंगरावरून उडी, काळजाचा ठोका चुकवणारा तरूणीचा स्टंट, पाहा व्हीडिओ....
viral video
| Updated on: Apr 09, 2022 | 2:38 PM

मुंबई : चित्रपटांमध्ये आपण सायकल स्टंटचे अनेक धोकादायक स्टंट (Stunts) पाहिले आहेत. पण खऱ्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला उंच टेकडीवरून सायकलवर (Bicycle) धोकादायक स्टंट करताना पाहिले आहे का? नसेल तर तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ तुमच्यासाठी… सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडिओमध्ये एक मुलगी सायकलवर बसून उंच टेकडीवरून खाली उडी मारताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल हा व्हीडिओ खरा आहे का? व्हीडिओमध्ये दिसणारी तरुणी सायकलवरून स्टंट करताना दिसतेय. तिला पाहून थक्क नेटकरी थक्क झालेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी असल्याचं दिसून येतं. त्याचवेळी तिथे एक मुलगी उभी असलेली दिसते. मग सायकलवरून एक मुलगी येते आणि टेकडीवरून उडी मारते. हे दृश्य खूपच रोमांचक आहे. टेकडीवरून उडी मारल्यानंतर ती मुलगी सुखरूपपणे दुसऱ्या टोकावर जमिनीवर पोहोचते. हे पाहून आश्चर्य वाटेल आहे, कारण ती ज्या टेकडीवर चढते ती खूप उंच टेकडी आहे. चित्रपटातील सीन्सना लाजवेल असा हा व्हीडिओ आहे.  हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर BEAUTIFUL DESTINATIONS नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 61 लाख लोकांनी लाईक केलंय. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले की, कमाल! काय स्टंट आहे. तर दुसरा युजर म्हणतो, खतरनाक, हा व्हीडिओ पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. तर आणखी एका युजरने या स्टंटगर्लला स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. स्टंट उत्तम करतेय. पण स्वत:ची काळजी घे, असं या नेटकऱ्याने म्हटलंय.

संबंधित बातम्या

Viral Video : झेब्राच्या पिल्लावर हल्ला, आईच्या निर्धारापुढे सिंहाचाही नाही लागला टिकाव, पाहा थरारक व्हीडिओ…

VIDEO : जेवणासाठी कुत्र्याने केला खास जुगाड, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

Social Media Trending : घोड्याचा लोकल प्रवास, सोशल मीडियावर व्हायरल