Viral news : चिडलेल्या प्रियकराचं मन वळवण्यासाठी प्रेयसीने लिहिलं प्रेमपत्र, ‘जानू, टोमॅटो, कबूतर, रसगुल्ला…, पाहा अजून काय काय लिहिलंय

आतापर्यंत ही पोस्ट 14 हजार लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत.

Viral news : चिडलेल्या प्रियकराचं मन वळवण्यासाठी प्रेयसीने लिहिलं प्रेमपत्र, जानू, टोमॅटो, कबूतर, रसगुल्ला..., पाहा अजून काय काय लिहिलंय
viral love letter
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 19, 2023 | 2:06 PM

मुंबई : सोशल मीडियावर (social media) एक प्रेम पत्र व्हायरल (viral love letter) झालं आहे. त्यामध्ये प्रेयसीने आपल्या रुसलेल्या प्रियकराला मनवण्यासाठी अनेक गोष्टी पत्रात लिहील्या आहेत. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेक कमेंट येत आहेत. त्यामध्ये काही चांगल्या कमेंट आहेत, तर काही वाईट कमेंट आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांनी ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. प्रियकर नाराज झाल्यामुळे प्रेयसीला काय करावं लागतंय ते पत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. प्रेम पत्रात प्रेयसीने प्रियकराला (boyfriend) ‘जानू, टोमॅटो, कबूतर, रसगुल्ला, असे शब्द वापरले आहेत. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. ते वाचल्यानंतर तुम्ही सुध्दा हैराण होऊ शकता. प्रेम पत्रात प्रेयसीने हिंदीमध्ये बरंच काही लिहीलं आहे.

नेमकं पत्रात काय लिहीलं आहे

“जानू मैं तुम्हारे ऊपर शक नहीं करती. किसी लडकी को तुझसे बोलते हुए देखती हूं… ना तो दिल में दर्द होता है. बहुत ज्यादा होता है. जानू तुम किसी भी लड़की से बोला मत करो, न ही मुस्कुराया करो. जानू गलत नहीं समझ रही हूं, मैं आपको. जानू मुझे तुमसे प्यार है, इसलिए कह रही हूं. कबूतर मानो तो मान लेना.. न मानो तो तुम्हारी मर्जी और जानू तुम उनके घर बिल्कुल भी मत जाया करो, चाहे वो लड़की हो या न हो. मुन्ना, कबूतर माफ करना अगर गलत लिखा हो तो. आई लव यू, आई लव यू, आई लव यू. सॉरी मुन्ना अगर कुछ गलत लिखा हो तो मेरे कबूतर, जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला. आई मिस यू.” हे सगळं प्रेयसीनं त्या पत्रात लिहीलं आहे.

पाहा नेटकरी काय म्हणाले

हे पत्र वाचल्यापासून अनेक नेटकरी भावनिक झाले आहेत. सोशल मीडियावर त्या पत्राचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. theadulthumour या नेटकऱ्याने तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. आतापर्यंत ही पोस्ट 14 हजार लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, त्यांच्या जाग्यावर मी असतो, तर जीव सुध्दा द्यायला तयार झालो असतो. दुसरा नेटकरी म्हणतो, अशी म्हणणारी गर्लफ्रेंड खूप कमी पाहायला मिळते. त्यामुळे खरं प्रेम करणाऱ्या प्रेयसीला माफ करा. तिसरा म्हणतो, तू खूप लकी माणूस आहेस, त्यामुळे तुला अशी गर्लफ्रेंड मिळाली आहे.