शानदार, रुबाबदार, दिमाखदार, प्रजासत्ताक सोहळ्यातला एक Video निवडायचा झाला तर तो हाच !

शानदार, रुबाबदार, दिमाखदार, प्रजासत्ताक सोहळ्यातला एक Video निवडायचा झाला तर तो हाच !
17 जॅग्वार विमान

आज संपूर्ण भारतामध्ये 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँड प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाप्रकारे संचलन(Republic Day of India) मोठ्या दिमाखात पार पडले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 3:30 PM

मुंबई : आज संपूर्ण भारतामध्ये 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँड प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाप्रकारे संचलन(Republic Day of India) मोठ्या दिमाखात पार पडले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आर्मीची राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री, शीख लाईट इन्फंट्री, आर्मी ऑर्डिनन्स कोर रेजिमेंट आणि भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या एका मार्चिंग दलाचा समावेश होता.

ANI शेअर केला खास प्रजासत्ताक सोहळ्यातला व्हिडीओ 

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला 10.30 सुरुवात झाली होती. आता भारतीय हवाई दलाचा एक व्हिडीओ ANI ने शेअर केला आहे. ज्यामध्ये 17 जॅग्वार विमान दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे आकाशामध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कर्तव्य दाखवत आहेत. इतकेच नव्हेतर 17 जॅग्वार विमानाने आकाशामध्ये 75 हा आकडा देखील तयार केला. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हा व्हिडीओ बघितल्यावर दुश्मनाच्या हृदयात धडकी नक्की भरेल. हा व्हिडीओ शेअर करताना ANI लिहिले की, #WATCH Amrit formation comprising 17 Jaguar aircraft make a figure of 75 on #RepublicDay

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी नॅशनल वॉर मेरोरियर येथे गेले होते. तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विविध युद्ध आणि ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना  अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी व्हिजिटर बुकवर सही केली. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडची टोपी परिधान केली आहे. या टोपीवर ब्रह्मकमळ पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या खास टोपीची चर्चा आता सर्वत्र रंगलेली आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : पोपटाची चालण्याची स्टाईल पाहून हसून लोटपोट व्हाल … व्हिडीओ एकदा पाहाच!

VIDEO : विकेट घेतल्यानंतर ब्रावोच्या अंगात घुसला पुष्पा, श्रीवल्लीवर नाचत बॅट्समनला म्हणाला, मै नहीं झुकेगा’


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें