VIDEO : विकेट घेतल्यानंतर ब्रावोच्या अंगात घुसला पुष्पा, श्रीवल्लीवर नाचत बॅट्समनला म्हणाला, मै नहीं झुकेगा’

VIDEO : विकेट घेतल्यानंतर ब्रावोच्या अंगात घुसला पुष्पा, श्रीवल्लीवर नाचत बॅट्समनला म्हणाला, मै नहीं झुकेगा'
डान्स व्हिडीओ व्हायरल

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स केल्यापासून रोखू शकत नाहीये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 10:43 AM

मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये. पुष्पा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेंव्हापासून प्रत्येकजण या चित्रपटाचा फॅन झाले आहे.

पुष्पा चित्रपटातील गाण्यावर भर मैदानात ब्रावोचा डान्स

विशेष म्हणजे केवळ चित्रपटच नाही तर चित्रपटातील गाणीही इतकी सुपरहिट झाली आहेत की, जगभरातील सुपरस्टार त्यावर रील्स बनवताना दिसत आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo)ला ही चित्रपट प्रचंड आवडलेला दिसत आहे. विशेष म्हणजे ब्रावो अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो T20 लीगमध्ये खेळतो. ब्रावोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रावो चक्क विकेट घेतल्यानंतर भर मैदानामध्ये श्रीवल्ली गाण्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे.

तेरी झलक अशरफी श्रीवल्ली या गाण्यावर ब्रावो अल्लू अर्जुनची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतो आहे. ब्रावोच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरनेही चित्रपटातील गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या मुली हा डान्स करत आहेत. वॉर्नरने स्वतः व्हिडीओ बनवून ‘मैं झुकेगा नहीं’वरील पुष्पा चित्रपटाचा एक सीन शेअर केला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट!

VIDEO : तरूणाने ‘गुड नाल इश्क मीठा’वर केला स्टेज फाडू परफॉर्मन्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें