‘गोरी तोरी चुनरी बा लाल लाल रे’, हे गाणं नेमकं गायलंय कुणी, कोण आहे तो खरा बाल कलाकार

| Updated on: Jun 06, 2023 | 9:54 PM

सोशल मीडियावर सध्या एक भोजपुरी गाण्याची प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. अनेक जण या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत. अनेक तरुण-तरुणींना या गाण्याचं अक्षरश: वेड लागलं आहे. पण हे गाणं खूप जुनं आहे. हे गाणं नेमकं कोणत्या बालकलाकाराने गायलंय या विषयी आम्ही आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

गोरी तोरी चुनरी बा लाल लाल रे, हे गाणं नेमकं गायलंय कुणी, कोण आहे तो खरा बाल कलाकार
Follow us on

मुंबई : विशाल दुबे या बाल कलाकाराने 2001 साली मुंबईत, ‘गोरी तोरी चुनरी बा लाल लाल रे‘, हे गाणं म्हटलं, आणि हे गाणं आता शॉर्ट व्हिडीओला व्हायरल होत आहे. प्रत्येक बोली भाषेत एक गोडवा असतो. भोजपुरी भाषेतला हा गोडवा एवढ्या दिवसांनी व्हिडीओ रुपाने बाहेर आला आहे, आणि या गाण्याचा सुगंध सोशल मीडियावर दरवडतोय. हा गायक आता तरुण झाला आहे. पण त्याचे त्यावेळचे शब्द आजच्या तरुण-तरुणींना वेड लावतायत. या गाण्यात अनेक शब्द आहेत, ज्यांना भोजपुरी भाषेत आणि ज्यांना भोजपुरी भाषा नाही, त्यांनाही या गाण्याची स्टाईल आणि गायकाचं गाणं गाण्याची तऱ्हा आवडतेय. या गाण्यावर अनेक तरुणींनी, तरुणांनी आणि वृद्धांनी तसेच लहान मुलांनी देखील शॉर्ट व्हिडीओ बनवले आहेत.

शॉर्ट व्हिडीओच्या दुनियेत आणि सोशल मीडियाच्या जगात जुनं ते देखील सोनं ठरत असल्याचं समोर येत आहे. 2001 साली हे गाणं ऐकण्यासाठी या बालकलारासमोर हजारो लोकांचा समूह कान वासून बसला होता, फक्त या बालकलाकाराचे बोल ऐकण्यासाठी. यावेळी या बालकलाकाराच्या गळ्यात अनेकांनी फुलांच्या माळा टाकल्या तर अनेकांनी त्याला कृष्णासारखा फुलांचा ताज देखील डोक्यात घातला. पण या एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीसमोर या मुलाने आपले बोल पाहिजेत तसेच आणि आपल्या अनोख्या स्टाईलमध्येच गायले. हे गाणं आज ऐकताना या मुलाबद्दल सर्वांना कौतुक वाटतंय.

विशालला प्रेक्षकांची दाद

हे गाणं तो बाल कलाकार म्हणजेच विशाल दुबे गात असताना, त्याला त्यावेळी कुणीतरी हातात 10 रुपये येऊन देत होतं, तर कुणीतरी शंभर रुपये, ही त्याच्या गाण्याला दाद होती. विचार करा जे सर्वोत्कृष्ट आहे ते काही वर्षांनी का असेना, इंटरनेटवर आलं, झळकलं आणि लोकप्रिय झालं, त्याची कलाकारी, खरी कामगिरी, त्याची सृजनशीलता पुन्हा लोकांसमोर आली. हे शंभर नंबरी सोनं असलेलं गाणं आणि कलाकार पुन्हा 23 वर्षांनी पुढे आले, ते या गाण्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे, भाषा हा अडसर येथे तर कुठेच राहिला नाही. उलट वाढला या भाषेचा गोडवा आणि शब्दांची सुंदरता.

हा बालकलाकार गात असताना त्याला लोकगीताला साथ देतात, तसे त्याच्याकडे काही सहकारी आहेत, ते देखील त्याच्या गाण्याचा ताल अतिशय सुंदर पद्धतीने उचलून धरतात, त्यामुळे त्याच्या गाण्यात अधिकच रंगत येते आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आणखी वातावरण बदलून जातं मनमोहक होत जातं.