Vdieo | उंच उड्या मारत हवेत डान्स, आजोबांच्या थिरकण्याने कार्यक्रमात रंगत, व्हिडीओ पाहाच

Vdieo | उंच उड्या मारत हवेत डान्स, आजोबांच्या थिरकण्याने कार्यक्रमात रंगत, व्हिडीओ पाहाच
grandfather funny viral dance

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील बरेच व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांशी संबंधित असतात, तर काही व्हिडीओंमध्ये लोकांनी केकेली करामत दाखवलेली असते. माणसांच्या डोकॅलिटीचे काही व्हिडीओ तर विशेष चर्चीले जातात. सध्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आजोबांनी केलेल्या डान्समुळे त्यांची सगळीकडे वाहवा होत आहे. (grandfather dancing energetically with jumping video went viral on social media)

उंच उड्या मारत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा डान्स

हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये अनेक महिला तसेच पुरुष एकत्र आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या गाण्यावर महिला आणि पुरुष डान्स करताना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये सर्वात विशेष वाटणारा डान्स हा एका आजोंबाचा आहे. हे आजोबा हवेत उंच उड्या मारत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा डान्स करत आहेत. त्यांची उड्या मारण्याची अनोखी पद्धत नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे. ‘हारे हारे हारे हम तो दिल से हारे’ या हिंदी गाण्यावर या आजोबांनी डान्स केला आहे. गाण्याचे बोल तसेच संगीतामध्ये होणार बदल चपखलपणे हेरून हे आजोबासुद्धा उड्या मारत आहेत.

उत्साह आणि बेधडकपाणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडला

डान्स करतानाचा या अजोबांचा उत्साह अगदीच निराळा आहे. चार लोकांमध्ये नाचायचं म्हटलं तर आजकालचे तरुण नाक मुरडतात. पण या आजोबांतील उत्साह आणि बेधडकपाणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Fanny Video (@funnyvideos1377)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आजोबांची स्फूर्ती आणि उड्या मारून डान्स करण्याची त्यांची पद्धत नेटकऱ्यांना अतिशय आवडली आहे. नेटकरी त्यांच्या या डान्सचे दिवाने झाले असून त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तसेच मजेदार कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | दोन लहान मुलांची जुंपली, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण, बघ्यांची गर्दी, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | ओह तेरी! बघता बघता तरुणाने ब्रिजवरून थेट उडीच मारली, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

(grandfather dancing energetically with jumping video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI