व्हिडीओ बघून तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांची येईल आठवण! भावुक करणारा व्हिडीओ

आजकाल तर एकत्रित कुटुंब पद्धती संपल्यातच जमा आहे. आत्ताच्या मुलांना सुट्ट्या लागणं, सुट्टीत आजोळी जाणं, आजी आजोबांनी दिलेला खाऊ खाणं हे काही माहितीच नाही. आई वडिलांचं प्रेम एका जागी आणि आजी आजोबांचं एका जागी. सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

व्हिडीओ बघून तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांची येईल आठवण! भावुक करणारा व्हिडीओ
Grandparents gives surprise
| Updated on: Jul 06, 2023 | 1:43 PM

मुंबई: आजी आजोबांकडून कधी गिफ्ट मिळालंय का? आजी आजोबांचं प्रेम मिळायला सुद्धा नशीब लागतं नाही का? आजकाल तर एकत्रित कुटुंब पद्धती संपल्यातच जमा आहे. आत्ताच्या मुलांना सुट्ट्या लागणं, सुट्टीत आजोळी जाणं, आजी आजोबांनी दिलेला खाऊ खाणं हे काही माहितीच नाही. आई वडिलांचं प्रेम एका जागी आणि आजी आजोबांचं एका जागी. सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.आजी आजोबा आपल्या नातवाला एक सायकल गिफ्ट करतायत. हा व्हिडीओ बघून तुम्हाला तुमची पहिली सायकल आठवेल किंवा आजी आजोबा तर नक्कीच आठवतील. व्हिडीओ खूप भावुक करणारा आहे. यातल्या लहान मुलाची प्रतिक्रिया बघण्या सारखी आहे.

हा व्हिडीओ बघा. आजोबा एक नवी कोरी करकरीत सायकल घेऊन येतात. त्यांच्या नातवासाठी ही सायकल आहे. ते नातवाला कडेवर घेऊन बाहेर येतात. त्यांनी त्याचे डोळे रुमालाने झाकलेत, सोबत आजी सुद्धा आहे. आजी आजोबांकडून ही सायकल त्याला सरप्राइज गिफ्ट आहे. सायकल जवळ घेऊन आल्यावर मुलगा हळूच रुमाल खाली घेतो आणि सायकल बघून त्याला काय करावं हे सुचत नाही तो लगेच आजोबांना बिलगतो. हा व्हिडीओ खूप गोंडस आहे. हे पाहताना आपल्याला देखील आपले लहानपणीचे दिवस आठवतात. आपल्यालाही आपली पहिली सायकल आणि आपले आजी आजोबा आठवतात.

‘जिंदगी गुलजार है’ या इन्स्टाग्राम पेजवरून 3 जुलै रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- “लहानपणी सायकल मिळाल्याचा एक वेगळाच आनंद होता.” या क्लिपला 8 लाख 26 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 87 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका व्यक्तीने लिहिलं- आजी-आजोबांचं प्रेम.