गिफ्ट मिळालेली गाडी, नवरदेवाने ब्रेकऐवजी क्लच दाबला! धक्कादायक घटना

| Updated on: Nov 04, 2022 | 10:43 AM

गाडी कशी चालवायची हे माहीत नसतानाही केवळ दिखावा करण्यासाठी अरुणने गाडी टेस्ट ड्राइव्हसाठी नेली.

गिफ्ट मिळालेली गाडी, नवरदेवाने ब्रेकऐवजी क्लच दाबला! धक्कादायक घटना
gifted car
Image Credit source: Social Media
Follow us on

जेव्हा जेव्हा एखाद्या घरात लग्न ठरलेलं असतं, तेव्हा केवळ नवरदेवासाठीच नाही तर वधूच्या कुटुंबासाठीही आनंदाची गोष्ट असते. या मेगा इव्हेंटसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतेच पण प्रत्येकजण त्याचा पुरेपूर आनंद लुटतो. मात्र, उत्तर प्रदेशातील एका कुटुंबासाठी लग्नसोहळा हे एक दुःस्वप्न बनले, जे ते कधीही विसरणार नाहीत. यूपीच्या इटावा जिल्ह्यात अरुण कुमार या 24 वर्षीय नवरदेवाने आपल्या मावशीला चिरडलं. इतकंच नाही तर इतर चार नातेवाईकांना गंभीर जखमी केलं. वधूच्या कुटुंबीयांनी त्याला ही कार भेट म्हणून दिली होती.

रिपोर्ट्सनुसार, अरुण कुमार हा पीएसीचा जवान आहे जो सध्या फतेहपूर जिल्ह्यात तैनात आहे आणि त्याचा विवाह औरैया येथील एका महिलेसोबत निश्चित करण्यात आला होता.

या भीषण घटनेचा विचार केला तर कार्यक्रमानंतर वधूच्या कुटुंबीयांनी नवरदेव अरुण कुमार यांना गाडीची चावी दिली तेव्हा हा प्रकार घडला. सोहळ्याच्या वेळी गाडी कशी चालवायची हे माहीत नसतानाही केवळ दिखावा करण्यासाठी अरुणने गाडी टेस्ट ड्राइव्हसाठी नेली.

जेव्हा तो माणूस चाकांच्या मागे गेला, तेव्हा त्याने ब्रेकऐवजी क्लच दाबला आणि कार्यक्रमस्थळी असलेल्या नातेवाईकांमध्ये गाडी घुसवली.

त्यांची ३५ वर्षीय मावशी सरला देवी यांना त्यांच्या कारने उडवले आणि त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. यात आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एक १० वर्षांची मुलगी होती, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन हाऊस ऑफिसर एकदिल यांनी सांगितले की, “आम्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ नुसार, जो कोणी घाईगडबडीने किंवा निष्काळजीपणाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणेल, जो सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत मोडतो, त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.”