Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या असाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने आपल्या नवरीला थेट उचलून घेतले आहे. एवढेच नाही तर त्याने सर्वांसमोर आपल्या नवरीला किस केलं आहे.

Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल
marriage viral video

मुंबई : सोशल मीडियावर आजकाल लग्न समारंभातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये नवरी आणि नवरदेवांची झालेली परेशानी नेटकऱ्यांना हसायला लावणारी असल्यामुळे या व्हिडीओंची समाजमाध्यमांवर चर्चा होत आहे. सध्या असाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने आपल्या नवरीला थेट उचलून घेतले आहे. एवढेच नाही तर त्याने सर्वांसमोर आपल्या नवरीला किस केलं आहे. (groom pick up his bride in his lap and kissing video went viral on social media)

भर मंडपात नवरीला उचललं

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लग्नसमारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसतेय. या गर्धीमध्ये नवरी-नवरदेव उभे आहेत. थोड्या वेळानंतर नवरदेवाने आपल्या नवरीला उचलून घेतले आहे. नवरीला उचलून घेतल्यानंतर हा नवरेदव तिला घेऊन गोल फिरतो आहे. नवरदेवाने आपल्या बायकोला गोल फिरवल्यानंतर त्याच्या बाजूला उभे असलेले बघे चांगलेच खुश झाले आहेत.

नवरदेवाने नवरीला किस केलं

नवरीला उचलून घेतल्यानंतर नवरदेव तिला घेऊन गोल फिरला आहे. तसेच त्यानंतर थोडा वेळ तिला उचलून धरून पुन्हा त्याने नवरीच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केलाय. नवरीने नकार देऊनही तो तिला पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी नवरीने गालावर किस करु न दिल्यामुळे नंतर नवरदेवाने नवरीच्या कपाळावर किस केले आहे. भर मंडपात नवरीला किस केल्यानंतर नेटकरी अवाक् झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला royal_couples48 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Summer Solstice | आज वर्षातील सर्वात मोठा दिवस, रात्र अवघ्या 10 तासांची, दिवस किती तासांचा?

Video | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची ‘ही’ कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : काहीही हं! थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच!

(groom pick up his bride in his lap and kissing video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI