Video : काहीही हं! थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jun 21, 2021 | 3:30 PM

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लग्न समारंभातील असतात. सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे

Video : काहीही हं! थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहाच!
बैलगाडीमधून लग्नाची वरात

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लग्न समारंभातील असतात. सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव चक्क वरात बैलगाडीमध्ये घेऊन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील देवरियाचा असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नाच्या वरातीमध्ये गाडी, घोडा किंवा इतर काही नसून चक्क वरात ही बैलगाडीतून जात आहे. (Groom barat on bullock carts video goes viral on social media)

रिपोर्टनुसार, ही वरात देवरियाच्या कुशारी गावातून निघाली होती. या बैलगाडीत सर्व वर मंडळी बसलेले दिसत आहेत. ही लग्नाची वरात जेंव्हा मुख्य बाजारापेठेच्या रस्त्यावर आली तेंव्हा लोक तिथे जमत आश्चर्यकारक होऊन पाहात होते. कारण आपल्याला माहिती आहे की, लग्नाची वरात म्हटंल्यावर गाड्या, घोडे आणि बॅंडपथक असतेच, मात्र ही अनोखी बैलगाडीतून जाणारी वरात होती. यावेळी लोकांनी या वरातीचे फोटो आणि व्हिडीओ घेतले आणि सोशल मीडियावर शेअर केले.

विशेष म्हणजे या वरातीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लोकांनी या व्हिडीओला लाईक करत यावर कॅमेंट देखील केल्या आहेत. यावर नवरदेवाला विचारण्यात आले तेंव्हा नवरदेव म्हणाला की, आपले पूर्वज अशाचप्रकारे लग्नाची वरात घेऊन जात होते. मात्र, गाड्यांमुळे आपण आपली परंपरा विसरलो आहोत. यामुळे मी बैलगाडीवरुन वरात घेऊन जाण्याचे ठरवले.

मध्यंतरी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले होते. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला होता. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा होता. मात्र, त्यावेळी तो नवरदेव शांत बसलेला नव्हता तर भर मंडपात तो नवरदेव थेट तंबाखू चोळत होता आणि खात होता. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या : 

Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !

VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात

Viral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल

(Groom barat on bullock carts video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI