AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल

अमेरिकेतील एका युवकाने आपल्या प्रेयसीला लग्नाबद्दल विचारण्यासाठी खास डोकं लावलं आहे. या तरुणाने आपल्या प्रेमिकेला डोंगर, दरी, किंवा बागेमध्ये लग्नासाठी विचारणा केलेली नाहीये. तर त्यांने एका प्राणीसंग्रहालयामध्ये आपल्या प्रेमिकेकडून लग्नासाठी होकार मिळविला आहे.

Viral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली 'ही' खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल
MARRIAGE PROPOSAL
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 4:56 PM
Share

मुंबई : आपल्या प्रेमिकेला लग्नासाठी विचारणा करतानाचा क्षण हा कधीही विसरता येणार नाही असा असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तो क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकजण जमेल तसे प्रयत्न करतो. अमेरिकेतील एका युवकाने आपल्या प्रेयसीला लग्नाबद्दल विचारण्यासाठी खास डोकं लावलं आहे. या तरुणाने आपल्या प्रेमिकेला डोंगर, दरी, किंवा बागेमध्ये लग्नासाठी विचारणा केलेली नाहीये. तर त्यांने एका प्राणीसंग्रहालयामध्ये आपल्या प्रेमिकेकडून लग्नासाठी होकार मिळविला आहे. (man proposes his Girlfriend in Zoo in front of Hippopotamus photos goes viral on social media)

लग्नासाठी विचारलं अन् तिनेही होकार दिला

अमेरिकेच्या या तरुण आणि तरुणीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तरुण आपल्या प्रेयसीला प्राणीसंग्रहालयात प्रपोज करताना दिसतोय. त्याने गुढग्यावर बसून आपल्या प्रेमिकेसमोर अंगठी करत लग्नासाठी विचारलं आहे. विशेष म्हणजे फोटोतील तरुणीनेसुद्धा लग्नाचे हे प्रपोजल आनंदाने स्वीकारले आहे. त्यांची लव्हस्टोरी एका प्राणीसंग्रहालयामध्ये यशस्वी झाल्यामुळे नेटकरी चांगलेच खुश आहेत.

आगळ्या वेगळ्या प्रपोजलची प्राणीसंग्रहालयाकडून दखल

आपल्या प्रेमिकेला लग्नासाठी एका प्राणीसंग्रहालयामध्ये विचारण्याची संकल्पना अनेकांना आवडली आहे. या प्रेमी युगुलाचे फोटो पाहून अनेकजण मजेदार कमेंट्स करत आहेत. या जोडीने लग्नासाठी एकमेकांना होकार दिल्यानंतर प्राणीसंग्रहालय प्रशासनाने त्यांची विशेष दखल घेतली आहे. त्यांनी या जोडीचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले असून Hippo Cove मध्ये एक विशेष क्षण ! तिने होकार दिला आणि Fiona या मादा पानघोड्यानेही संमती दिली. असे मजेदार कॅप्शन या फोटोसोबत देण्यात आले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिलेली अंगठी दिसत आहे.

दरम्यान, प्रपोज करण्याची ही अनोखी पद्धत अनेकांना आवडली आहे. लोक या फोटोला रिट्विट तसेच मजेदार कमेंट्स करत आहेत. ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इतर बातम्या :

Video | या जगात सर्वात जास्त नशा कशामध्ये आहे ? मुलीने दिले ‘हे’ उत्तर, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : कोरोनाची लस घेताच बेशुद्ध, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(man proposes his Girlfriend in Zoo in front of Hippopotamus photos goes viral on social media)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.