AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

सध्या असाच एका हत्तीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीची पाणी पिण्याची पद्धत सर्वांनाच आवडली आहे.

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !
ELEPHANT VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 11:25 PM
Share

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एक घटना घडली आहे. या कॅम्पमधील एक हत्ती हापशाच्या पाण्याने आपली तहान भागवतो आहे. तो आपल्या सोंडीने नापशामधून पाणी काढतो आहे. सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. मात्र, या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमधील हत्तीची पाणी पिण्याची पद्धत सर्वांनाच आवडली आहे. (Elephant drinking water form hand pump video goes viral on social media)

हापशातून पाणी काढून भागवली तहान

गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कॅम्पमध्ये वन विभागाकडे जवळपास 9 हत्ती आहेत. या हत्तींना वन विभागाकडून प्रशिक्षण दिले जाते. तसेच येथे त्यांच्याकडून साग तस्करी रोखण्यासाठी किंवा जंगलातून सागवानाची वाहतूक करण्यासाठी या हत्तींचा उपयोग केला जातो. यावेळी यापैकीच एका हत्तीने जंगलात फिरताना आपल्या सोंडेच्या माध्यमातून हापशातून पाणी काढून आपली तहान भागवली आहे. वन्य प्राण्यात हत्ती एक असा बुद्धिवान प्राणी आहे ज्याला प्रशिक्षण दिल्यावर माणसाच्या हालचाली वरही तो लक्ष ठेवू शकतो.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

हत्ती समोर दिसला की सगळेच घाबरतात. त्याचे महाकाय शरीर पाहून अनेकजण त्याच्यापासून दूर राहणेच पसंद करतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपल्याला या हत्तीच्या प्रेमात पाडणारा आहे. व्हिडीओमध्ये एक हत्ती समोरच्या हापशाजवळ उभा असल्याचे दिसतोय. त्याला तहान लागल्यामुळे तो हापशामधून थेट पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आपल्या सोंडीने हापसा खाली-वर करतोय. तसेच हापशाला कसलीही इजा होणार नाही, याचीसुद्धा तो काळजी घेतोय.

आक्रस्ताळेपणा न करता पाणी बाहेर येण्याची वाट पोहतोय हत्ती

हापशामधून पाणी काढत असताना हा हत्ती अतिशय समजदारीने वागतोय. तहान लागलेली असली तर तो आक्रस्ताळेपणा न करता हापशामधून पाणी बाहेर येण्याची वाटत पाहतो आहे. व्हिडीओच्या शेवटी हापशामधून पाणी आल्यानंतर तो खाली जमा झालेले पाणी आपल्या सोंडीने पितो आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान,  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत 29 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अजूनही लोक या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ

(Elephant drinking water form hand pump video goes viral on social media)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.