Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ

माणसाने आतापर्यंत 36 वेळा लग्न केले असून तो 37 वेळा पुन्हा एकदा नवरदेव झाला आहे. म्हणजेच तो 37 वे लग्न करत आहे.

Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ
MAN MARRIAGE VIRAL VIDEO

मुंबई : लग्नाची हौस कुणाला नसते ? आपला लग्नसोहळा हा थाटामाटात पार पडावा असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुम्ही अवाक् व्हाल. या व्हिडीओमधील माणसाने आतापर्यंत 36 वेळा लग्न केले असून तो 37 वेळा पुन्हा एकदा नवरदेव झाला आहे. म्हणजेच तो 37 वे लग्न करत आहे. (man having 37th Marriage in front of his 28 wives 135 children video goes viral on social media)

आतापर्यंत 36 लग्न, 37 वेळा नवरदेव

लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडीओंमध्ये कधी नवरा मुलगा तर कधी नवरीची फजिती दाखवलेली असते. तर काही व्हिडीओंमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा विनोद झाल्याचे आपल्याला दिसते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाचे लग्न आहे. हा माणूस थोडा वयस्कर वाटत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ आपल्याला साधारण वाटू शकतो. मात्र, या व्हिडीओमागील सत्यता समोर आल्यानंतर अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. असे म्हटले जात आहे की, या व्हिडीओतील माणसाचे म्हणजेच नवरदेवाचे यापूर्वी 36 लग्न झाले आहेत. आता तो 37 वेळा नवरदेव होतो आहे.

28 बायका, 135 मुलं-मुली आणि 126 नातवंडांसमोर लग्न

एवढेच नाही तर या माणसाच्या लग्नाला त्याच्याच कुटुंबातील लोक उपस्थित आहेत. हा माणूस आपल्या 28 बायका, 135 मुलं-मुली आणि 126 नातवंडांसमोर लग्न करत असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नसमारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरील माहिती ही आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल

दरम्यान, या व्हिडीओतील माणूस हा दिसायला वयस्कर असला तरी त्याचे हे कितवे लग्न आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. तसेच व्हिडीओ नेमका कुठला आहे ? हेसुद्धा समजलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून उस्त्फूर्तपणे मजेदार कमेंट्स केल्या आहेत. रुपीन शर्मा यांनी हा माणूस अतिशय धाडसी असल्याचे सांगितले आहे.

इतर बातम्या :

Video | शेवटच्या घटका मोजत असलेला पक्षी पाहिला अन् माणुसकी जिवंत झाली, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

अवघ्या एका महिन्यात मोडला रेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म!

Video | इवल्याशा कासवामुळे जंगलाच्या राजाची फजिती, पाणी पिताना सिंह झाला चांगलाच परेशान

(man having 37th Marriage in front of his 28 wives 135 children video goes viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI