Video | इवल्याशा कासवामुळे जंगलाच्या राजाची फजिती, पाणी पिताना सिंह झाला चांगलाच परेशान

सध्या सिंहाचा आणि कासवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इवल्याशा कासवाने एवढ्या मोठ्या सिंहाला परेशान करुन सोडलं आहे.

Video | इवल्याशा कासवामुळे जंगलाच्या राजाची फजिती, पाणी पिताना सिंह झाला चांगलाच परेशान
LION AND TORTOISE

मुंबई : सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ हे थरारक असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर विशेष पसंदी मिळते. त्यामुळेच की काय सध्या सिंहाचा आणि कासवाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इवल्याशा कासवाने एवढ्या मोठ्या सिंहाला परेशान करुन सोडलं आहे. (little Tortoise stopping Lion from drinking water video goes viral on social media)

कासवाच्या पिलामुळे सिंह चांगलाच परेशान

असं म्हणतात की सिंह हा जंगलाचा राजा असतो. त्याला पाहून इतर प्राणी हे सैरावैरा पळतात. त्याच्या वाटेला जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो आपल्या सर्वांनाच चकित करणारा आहे. एका कासवाच्या पिलामुळे सिंह चांगलाच परेशान झाला. त्याला हे छोटेसे कासव पाणी पिऊ देत नाहीये.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कोणत्या जंगलातील आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक सिंह तहानलेला असल्यामुळे तो पाणी पिताना दिसतोय. तो तन्मयतेने पाणी पित आहे. मात्र, याच वेळी पाण्यातून कासवाचे एक छोटेसे पिल्लू सिंहाकडे येत आहे. एवढंच नव्हे तर हे छोटेसे कासव सिंहाच्या तोंडाजवळ जाऊन त्याच्या खोड्यासुद्धा काढत आहे.

छोट्याशा कासवाकडून सिंहाला त्रास

कासवाच्या पिलाचा हा प्रताप पाहून सिंह वैतागल्याचे वाटतेय. हा सिंह कासवापासून दूर जाऊन लगेच दुसऱ्या ठिकाणी पाणी पित आहे. पण याही ठिकाणीसुद्धा कासवाचे पिल्लू आपल्याचे दिसतेय. दुसऱ्या ठिकाणीसुद्धा कासवाचे पिल्लू सिंहाला त्रास देत आहे. सिंह मात्र बिचारा गप्प बसला आहे.

पाहा व्हिडीओ :

लोकांच्या भन्नाट कमेंट्स

कासवाच्या पिलाची हीच हिम्मत अनेकांना आवडली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हा मजेदार व्हिडीओ ते आपल्या अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | गाडी पार्क करुन ऐटीत निघाला, मध्येच कुत्र्याने एन्ट्री केली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

(little Tortoise stopping Lion from drinking water video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI