Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ एका छोट्या मुलाचा आहे. व्हिडीओतील मुलगा बोबडे बोलत अरिजीत सिंहने गायलेलं गाणं गात आहे.

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल
BOY VIRAL VIDEO


मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (viral Video) होतात. यापैकी काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. त्यांना पाहताक्षणी आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. खळखळून हसायला लावणारे हेच व्हिडीओ नेहमी ट्रेंडिगवर असतात. सध्या अशाच प्रकराचा मूड फ्रेश करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका छोट्या मुलाचा आहे. व्हिडीओतील मुलगा बोबडे बोलीमध्ये अरिजीत सिंहने (Arijit Singh) गायलेलं गाणं गात आहे. (video of kid singing song of Arijit Singh goes viral on social media)

बोबडे बोल ऐकून नेटकरी खूश

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये एक माणूस कारमध्ये बसलेला दिसतोय. कारमध्ये बसून हा माणूस सुरुवातीला बाहेर उभ्या असलेल्या मुलांशी बोलतोय. त्यानंतर एका छोट्या मुलाने गाणे म्हणून दाखवण्याची तयारी दर्शवल्यानंतर कारमधील माणसाने त्याला आपल्या कारमध्ये घेतले आहे. कारमध्ये बसल्यानंतर हा मुलगा अत्यंत गोड आवाजात आपल्या बोबड्या बोलीमध्ये सुंदर गाणे गात आहे.

छोट्या मुलावर नेटकरी फिदा

हा मुलगा कारमधील माणसाशी अतिशय प्रेमळपणे बोलत आहे. तसेच कारमधील माणसाने गाणे गायला सांगितल्यानंतर तो अरिजीत सिंहने गायलेले ‘मुझे छोडकर जो तूम जाओगे’ हे गाणे जसेच्या तसे गाण्याचा प्रयत्न करतोय. गाणे गाताना त्याचे बोबडे बोल नेटकऱ्यांना चांगलेच भावले आहेत.बोबड्या शब्दांमधील त्याचा आवाज नोटकऱ्यांना चांगलाच आवडतोय.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांना व्हिडीओ चांगलाच आवडला

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक या व्हिडीओला वेगवेगळ्या सामाजमाध्यमावर शेअर करत आहेत. अनेकांनी आपल्या फेसबूक पेजवरसुद्धा या व्हिडीओला अपलोड केले आहे. नेटकऱ्यांनी या मुलाप्रति आपले प्रेम व्यक्त केले असून त्याच्या गोड आवाजाची प्रशंसा केली आहे.

इतर बातम्या :

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांची झुंड, जुन्नरमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं ‘हे’ काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

(video of kid singing song of Arijit Singh goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI