AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

या व्हिडीओमधील तरुणी नुसरत फतेह अली खान यांचं एक गाणं गात आहे. भारतीय नेटकरी या तरुणीच्या आवाजाच्या प्रेमात पडले असून तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (pakistani girl song viral video)

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
PAKISTANI GIRL SINGING SONG
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:25 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगलेच प्रेमात पाडतात. सध्या एका पाकिस्तानी तरुणीचा (Pakistani girl) व्हिडीओ भारतात धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमधील तरुणी नुसरत फतेह अली खान यांचं एक गाणं गात आहे. भारतीय नेटकरी या तरुणीच्या आवाजाच्या प्रेमात पडले असून तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Pakistani girl singing song kali kali zulfon ke phande na dalo video goes viral in India)

तरुणीच्या गोड गळ्यावर नेटकरी फिदा

रिदा खान या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तरुणी गिटारवर नुसरत फतेह अली खान यांचं गीत गात आहे. ‘काली-काली जुल्फों के फंदे ना डालो’ या गाण्याला ती तिच्या आवाजामध्ये गात आहे. तिचा दर्दभरा आवाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडतो आहे.

रिदा खानने हा व्हिडीओ 5 जून रोजी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर अपलोड केला होता. तेव्हापासून हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे. या व्हिडीओमध्ये ती अंत:करणातून गाणं गात आहे. गाण्याप्रतिचे तिचे हेच समर्पण नेटकऱ्यांना आवडले आहे.

व्हिडीओ पाहून कमेंट्सचा पाऊस

रिदा खानचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. ते या गाण्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. रिदा खान तू अप्रतिम आहेस, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अशा आवाजात गीत ऐकणे म्हणजे कमालीचे आहे, असे म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला आतापर्यंत दोन लाख व्ह्यूज

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तसेच आतापर्यंत या व्हिडीओला 20 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर तब्बल चार हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले आहे.

इतर बातम्या :

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

Video | रस्ता नेमका ओलांडावा कसा ? शेवटी मोठा भाऊ सरसावला, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | चेहऱ्यावर लावला अन् महिला हसायला लागली, नव्या एलईडी मास्कची चर्चा, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Pakistani girl singing song kali kali zulfon ke phande na dalo video goes viral in India)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.