AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | चेहऱ्यावर लावला अन् महिला हसायला लागली, नव्या एलईडी मास्कची चर्चा, पाहा व्हायरल व्हिडीओ

एक फॅशनेबल आणि अनोखा मास्क चर्चेचा विषय ठरतो आहे. या मास्कचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. (women led mask corona funny video)

Video | चेहऱ्यावर लावला अन् महिला हसायला लागली, नव्या एलईडी मास्कची चर्चा, पाहा व्हायरल व्हिडीओ
LED MASK VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 10:17 PM
Share

मुंबई : कोरोनामुळे जगणं अवघड झालं आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग अशा गोष्टींची आपल्याला आता सवय झाली आहे. तसेच चांगल्या प्रतीचा मास्क वापरणे आता एका प्रकारे फॅशन झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक फॅशनेबल आणि अनोखा मास्क चर्चेचा विषय ठरतो आहे. या मास्कचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा चक्क एलईडी मास्क ( LED mask amid) असून त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. (women wear LED mask amid Corona funny video goes viral on social media)

बाजारात आला एलईडी मास्क

सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क आले आहेत. मल्टीलेयर्ड तसेच विविध रंगाचे मास्क सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सुरुवातीला मास्ककडे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठीचे साधन म्हणून पाहिले जायचे. मात्र, आता मास्क वापरण्यासाठी तो आपल्या सोईचा तसेच चेहऱ्याला साजेसा आणि आकर्षक असावा असे आपल्याला वाटत आहे. याच कारणामुळे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार बाजारात वेगवेगळे मास्क आले आहेत. सध्या बाजारात एक एलईडी मास्क आला आहे. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर बोलण्याचा प्रयत्न केला तर तो थेट चमकतो आहे. मास्कचे एलईडी लाईट्स हे ओठांच्या हालाचालीसोबत चालू आणि बंद होत आहेत.

मास्क पाहून महिला लागली हसायला

चेहऱ्यावर लावल्यानंतर हा मास्क अतिशय मजेदार दिसतोय. व्हिडीओतील महिलेच्या चेहऱ्यावरही अगदी तसाच मास्क दिसतोय. व्हिडीओतील महिला ज्या पद्धतीने बोलत आहे, त्याच लयीमध्ये मास्कवरील एलईडी लाईट्स हालचाल करत आहेत. लाईट्सची हालचाल पाहण्यासाठी ही महिलासुद्धा उत्सुक आहे. चेहऱ्यावर एलईडी मास्क लावल्यानंतर तिच्या बाजूचे लोक पोट धरुन हसत आहेत. तसेच लावलेला मास्क कसा दिसतो हे पाहण्यासाठी या महिलेने जेव्हा हातात आरसा घेतला आहे; तेव्हा तिसुद्धा जोमात हसत आहे. तिलासुद्धा हसू आवरलेलं नाहीये.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तो शेअर केला आहे. शेअर करताना व्हिडीओला त्यांनी मजेदार कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भरभरून कमेंट्स करत असून त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Viral Video | नव्या जोडीचा लग्न मंडपात बहारदार डान्स, नवरीचे ठुमके पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Video | नळाच्या पाण्याखाली राजेशाही थाट, ठुमकत ठुमकत कासवाची शाही अंघोळ

Video | कुत्र्याला लागला पत्रकाराचा लळा, व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल !

(women wore LED mask amid Corona funny video goes viral on social media)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.