Video | कुत्र्याला लागला पत्रकाराचा लळा, व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल !

सध्या व्हायरल होत असेला व्हिडीओ हा एका कुत्र्याचा आहे. या कुत्र्याने केलेले कृत्य, त्याला लागलेला लळा सर्वांनाच भावला आहे. (dog emotional viral video)

Video | कुत्र्याला लागला पत्रकाराचा लळा, व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल !
dog viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर विशेष चर्चेत राहतात. सध्या व्हायरल होत असेला व्हिडीओ हा एका कुत्र्याचा आहे. या कुत्र्याने केलेले कृत्य, त्याला लागलेला लळा सर्वांनाच भावला आहे. (Dog have strong affection with reporter got emotional video goes viral on Social Media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

असं म्हणतात की कुत्रा हा सर्वांत इमानदार प्राणी आहे. तो आपल्या मालकाशी कायम प्रामाणिक राहतो. याच एका कारणामुळे लोक मोठ्या प्रमाणात कुत्रे पाळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा कुत्र्याचा हाच स्वभाव अधोरेखित करतोय. मिळालेल्या माहितीनुसार एक पत्रकार( रिपोर्टर) कुत्र्यांवर रिपोर्टिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी पत्रकाराने आपली रिपोर्टिंग पूर्ण केली. शेवटी हा रिपोर्टर वापस आपल्या घराकडे निघाला. पण तोपर्यंत व्हिडीओतील कुत्र्याला पत्रकाराचा चांगलाच लळा लागला. हा कुत्रा पत्रकाराला काही सोडत नव्हता. शेवटी या रिपोर्टरला व्हिडीओतील कुत्र्याला सोबत घेऊन जावे लागले.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, Rex Chapman या ट्विटर अकाऊंटवरुन तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंद केले जात असून त्याला आतापर्यंत तब्बल 27 लाख लोकांनी पाहिले आहे. तसेच तब्बल 15 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले आहे.

इतर बातम्या :

Video | चित्रकाराची किमया ! उभ्या झाडाच्या मधोमध सुंदर मुलगी, नेमकं रहस्य काय ?

Video | भर मंडपात नवरी रुसली, नवरदेवाची चांगलीच फजिती, पाहा व्हिडीओ

Magawa Rat | आतापर्यंत वाचवले हजारो लोकांचे प्राण, सुरुंग शोधणारा Magawa उंदीर अखेर निवृत्त

(Dog have strong affection with reporter got emotional video goes viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI