Video | चित्रकाराची किमया ! उभ्या झाडाच्या मधोमध सुंदर मुलगी, नेमकं रहस्य काय ?

Video | चित्रकाराची किमया ! उभ्या झाडाच्या मधोमध सुंदर मुलगी, नेमकं रहस्य काय ?

सध्या व्हायरल होत असलेल्या चित्रकारामध्ये काही वेगळीच कला आहे. त्याने चक्क झाडावर एक सुंदर पारदर्शक चित्र काढले आहे. (transparent painting of girl on tree video)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 05, 2021 | 8:12 PM

मुंबई : या जगात असे काही लोक आहेत जे कलेच्या जोरावर अमर झाली आहेत. तर काही कलाकारांनी अपार संपत्ती कमविली आहे. आपल्या भोवताली असलेल्या अनेक कलाकारांपैकी चित्रकार सर्वश्रूत आहेत. चित्रकाराचे सामर्थ सर्वांनाच माहिती आहे. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या चित्रकारामध्ये काही वेगळीच कला आहे. त्याने चक्क झाडावर एक सुंदर पारदर्शक चित्र काढले आहे. (artist draw transparent painting of Girl on tree video goes viral on social media)

चक्क झाडावर चित्र रेखाटले

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका चित्रकाराचा आहे. हा चित्रकार काही सामान्य नाहीये. त्याने चक्क झाडावर चित्र काढले आहे. झाडावर त्याने चित्रकलेचा एक उत्तम नमुना साकारला आहे.

चित्रकारकडून झाडावर चित्र रेखाटन

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे चित्रकार एका झाडावर चित्र रेखाटतो आहे. तो नेमके काय करतोय याचे व्हिडीओच्या सुरुवातीला आपल्याला आकलन होत नाही. मात्र, व्हिडीओ समोर पाहिल्यानंतर तो एका मुलीचे सुंदर चित्र रेखाटत असल्याचे आपल्याला समजते. चित्रकार रेखाटत असलेले चित्र हे काही साधे नाही. तो झाडावर चित्र काढत असून चित्रातील मुलगी ही आजूबाजूच्या वातावरणात उभी असल्याचे भासवण्याचा तो प्रयत्न करतोय.

मुलीच्या आजूबाजूचा परिसर बाजूच्या झाडांसारखा

अपार मेहनत घेऊन या चित्रकाराने एका मुलीचे चित्र साकारले आहे. हे चित्र परदर्शक असल्याचे आपल्याला वाटते. चित्रामध्ये मुलगी एका गोलाकार वस्तुवर उभी असून कुठेतरी पाहात आहे, असे या व्हिडीओमध्ये दिसतेय. मुलीच्या वर आणि खाली झाडाचे खोड आहे. तसेच चित्रकाराने चित्रातील मुलीच्या आजूबाजूचा परिसर हा बाजूच्या झाडासारखा रंगवला आहे. त्यामुळे झाडाच्या खोडामध्ये ही मुलगी उभी असल्याचा भास या चित्राकडे पाहून होतोय.

पाहा व्हिडीओ :

चित्र पाहून आयपीएस अधिकाऱ्याकडून वाहवा

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, चित्रकाराची ही कला अनेकांना आवडली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत असून व्हिडीओ शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा IPS Rupin Sharma यांनी शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Viral Video : रस्ता ओलांडण्यासाठी तरुण आला, पण अचानक ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

Viral Video : पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | जंगल सफारीमध्ये पर्यटक गुंग, अचानक सिंहाने केला हल्ला, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

(artist draw transparent painting of Girl on tree video goes viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें