Viral Video | मित्र आले अन् भलतंच घडलं, थेट अंगावरचे कपडे फाडले, मंडपात नवरदेवाची चांगलीच फजिती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 07, 2021 | 3:02 PM

कधीकधी असा प्रसंग समोर येतो ज्यामुळे याच नवरदेवाची चांगलीच फजिती होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा असाच आहे. (friends tore clothes of groom video)

Viral Video | मित्र आले अन् भलतंच घडलं, थेट अंगावरचे कपडे फाडले, मंडपात नवरदेवाची चांगलीच फजिती
VIRAL VIDEO OF GROOM

Follow us on

मुंबई : लग्न म्हटलं की एक वेगळाच थाट असतो. वऱ्हाडी मंडळी, लोकांची गर्दी, नातेवाईकांची वर्दळ हे लग्नामध्ये पाहण्यासारखं असतं. यामध्ये नवऱ्या मुलाचा रुबाब हातर काही वेगळाच असतो. एखाद्या राजाला लाजवेल अशी त्याची ऐट असते. मात्र, कधीकधी असा प्रसंग समोर येतो ज्यामुळे याच नवरदेवाची चांगलीच फजिती होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा असाच आहे. (friends misbehave with groom tore clothes video goes viral on social media)

मित्र आले आणि राडा झाला

हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या कार्यक्रमात नवऱ्या मुलासमोर मिठाई ठेवलेली दिसतेय. तसेच हा नवरदेव मंडपात मोठ्या थाटात बसल्याचे दिसतेय. मात्र, याच वेळी अचानकपणे नवरदेवाचे मित्र त्याच्याजवळ आले आहेत. यावेळी जवळ येऊन हे मित्र त्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, यावेळी अचानकपणे नवरदेवाचे काही मित्र त्याचा ड्रेस फाडायला लागले आहेत. नवरदेवाचे चार-चार मित्र एकाच वेळी त्याचा ड्रेस फाडण्यात गुंतलेले आहेत. आपल्या मित्राचे लग्न झाल्यामुळे ते आनंदात आहेत. दोन ते तीन मित्र ड्रेस फाडत असल्यामुळे नवरदेवाचा ड्रेस काही वेळानंतर पूर्णपणे फाटला आहे. तसे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी एवढं काही घडत असताना नवरदेवसुद्धा काही म्हणत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भर मंडपात नवऱ्या मुलाची त्याच्या मित्रांमुळे झालेली फजिती पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओला पाहून मित्र हे खूपच खट्याळ असतात, असे अनेक नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, ‘official_niranjanm87’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर करण्यात आलेल्या कमेंट्स या पाहण्यासारख्या आहेत.

इतर बातम्या :

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

Video | रस्ता नेमका ओलांडावा कसा ? शेवटी मोठा भाऊ सरसावला, व्हिडीओ एकदा पाहाच

(friends misbehave with groom tore clothes video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI