एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांची झुंड, जुन्नरमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

एकाच वेळेस तीन-तीन बिबट्यांची झुंड पहायला मिळणं हा योगायोग म्हणावा लागेल. जुन्नरच्या एका पीकअप चालकाला तीन बिबट्यांची झुंड एकत्रित पाहायला मिळाली. (Pune Junnar three leopards together Video Goes Viral on Social Media)

एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांची झुंड, जुन्नरमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
एकाच वेळेस तीन-तीन बिबट्यांची झुंड पहायला मिळणं हा योगायोग म्हणावा लागेल.

पुणे : जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांचं दर्शन होणं हे काही नवं नाहीय. येथील नागरिकांना काही दिवसांच्या अंतराने बिबट्यांचं दर्शन होत असते. ही गोष्ट आता नेहमीची झाली आहे. पण एकाच वेळेस तीन-तीन बिबट्यांची झुंड पहायला मिळणं हा योगायोग म्हणावा लागेल. एका पीकअप चालकाला तीन बिबट्यांची झुंड एकत्रित पाहायला मिळाली. यावेळीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. (pune Junnar three leopards together Video Goes Viral on Social Media)

भल्या पहाटेदरम्यान जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील पिकअप चालक संकेत आम्ले आपल्या पिकअपमधून पहाटे 3 वाजताच्या दरम्यान घरी जात असताना डिंगोरे गावठाणा लगत असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांना तब्बल तीन तगडे बिबटे पाहायला मिळाले. त्यांनी बिबट्यांची झुंड आणि त्यांच्या हालचाली आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या. गावालगतच्या स्मशानभूमीत हे तीनही बिबटे अगदी बिनधास्त फिरत होते.

एकाच वेळी तीन बिबटे पाहून एखादा घाबरला असता पण पीकअप चालक संकेत यांनी अजिबातही न घाबरता तिनही बिबट्यांच्या हालचाली आपल्या कॅमेरात टिपल्या. या व्हिडीओत तिनही बिबटे एकापाठोपाठ एक चालताना दिसून येत आहेत.

(pune Junnar three leopards together Video Goes Viral on Social Media)

एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांची झुंड

हे ही वाचा :

Viral Video | मित्र आले अन् भलतंच घडलं, थेट अंगावरचे कपडे फाडले, मंडपात नवरदेवाची चांगलीच फजिती

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं ‘हे’ काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI