Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या एका मोनालिसा नावाच्या महिलेचा एक जबरदस्त व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला थेट घोड्यावर बसून फेरफटका मारत आहेत.

Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच
MONALISA VIRAL VIDEO


मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणत्या विषयावर चर्चा होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर लहान मुलाचे तर कधी प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतात. मात्र, सध्या एका मोनालिसा नावाच्या महिलेचा एक जबरदस्त व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला थेट घोड्यावर बसून फेरफटका मारत आहेत. महिलेच्या याच धाडसाचं सोशल मीडियावर मोठं कौतूक होत आहे. (dashing women wearing saree rides horse video goes viral on social media)

मोनालिसा यांचे यूट्यूबवर लाखोंनी सबस्क्राईबर्स

सध्या व्हायरल होत असलेली मोनालिसा महिला ही ओडिसा राज्यातील आहे. ही महिला बुलेट, ट्रक मोठ्या आरामात चालवते. एवढंच नाही तर ट्रॅक्टरपासून ते बुलेटपर्यंत अशी सगळी वाहनं ही महिला चालवते. तसेच या महिलेला घोड्यावर बसून स्वार व्हायलासुद्धा आवडते. महिलेच्या याच धडाकेबाज वृत्तीमुळे तिचे यूट्यूबवर तब्बल 22.6 लाख सबस्क्राईबर्स आहेत. हे यूट्यूब चॅनेल तिने 2016 साली सुरु केले होते. विशेष म्हणजे धाडसी कामे करायला मोनालिसा यांचे पती बद्रीप्रसाद भद्र यांनीच प्रोत्साहित केलेले आहे.

मोनालिसाच्या धाडसाचं सगळीकडे कौतूक

आपल्या समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम लेखलं जातं. एखाद्या विशिष्ट कामाला पुरुषी कामाचे लेबल लावून त्याला स्त्रियांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मोनालिसा मेहनतीचे तसेच आतापर्यंत फक्त पुरुषच करत आलेले सर्व कामे मोठ्या शिताफीने करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्या एका घोड्यावर बसलेल्या दिसत आहेत. निळ्या रंगाची साडी घालून त्या मोठ्या शिताफीने घोड्यावर रपेट मारतायत. मोनालिसा यांचे याच धाडसामुळे सध्या सोशल मीडियावर कौतूक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मोनालिसा या महिलेचे याआधीसुद्धा अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. मात्र, सध्याच्या व्हिडीओमधील मोनालिसा यांचा थाट पाहण्यासारखा आहे. याच कारणामुळे सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांची झुंड, जुन्नरमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

(dashing women wearing saree rides horse video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI