Video | गाडी पार्क करुन ऐटीत निघाला, मध्येच कुत्र्याने एन्ट्री केली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्यामुळे एक माणूस चांगलाच पडला आहे.

Video | गाडी पार्क करुन ऐटीत निघाला, मध्येच कुत्र्याने एन्ट्री केली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच
DOG MAN ATTACK

मुंबई : अनेक लोकांना प्राण्यांची खूप आवड असते. आपल्या आवडीपोटी अनेकजण आपल्या घरात कुत्रे तसेच मांजरीसारखे प्राणी पाळतात. या प्राण्यांचा लडीवाळपणा आपल्याला हवाहवासा असतो. मात्र काही प्राण्यांमुळे कधीकधी आपण अडचणीतही सापडू शकतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्यामुळे एक माणूस चांगलाच पडला आहे. (Dog attack man while crossing road video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

या व्हिडीओमध्ये एक माणूस आपली गाडी पार्क करुन रस्ता ओलांडण्यासाठी येताना दिसतोय. हा माणूस जो रस्ता ओलांडणार आहे त्या रस्त्यावर अनेक गाड्या वेगात येत आणि जात आहेत. या सर्व गाड्यांचा आढावा घेत व्हिडीओतील माणूस रस्ता ओलांडण्यासाठी चालताना दिसतोय.

अन् कुत्र्याने जोराची धडक दिली

मात्र, याच वेळी अचानकपणे मागून एक कुत्रा त्याच्याकडे वेगात येत आहे. या कुत्र्याकडे व्हिडीओतील माणसाचे लक्ष नाही. परिणामी वेगात आलेल्या कुत्र्याने माणसाला थेट धडक दिली आहे. या जोराच्या धडकेमुळे व्हिडीओतील माणूस चांगलाच कोसळला आहे.

कुत्र्याने धडक दिल्यामुळे माणूस जखमी

या घटनेमध्ये कुत्र्याने टक्कर दिल्यानंतर माणूस जखमी झाल्याचे दिसत आहे. त्याच्या कंबरेला जोरात मार लागला असावा असे वाटतेय. समोरून गाड्या येत असल्यामुळे तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, प्रयत्न करुनही तो पुन्हा रस्त्यावर पडल्याचे दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत निश्चित माहिती मिळाली नसून त्याला ट्विटरवर Holy Cow या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं ‘हे’ काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

(Dog attack man while crossing road video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI