AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या एका महिन्यात मोडला रेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म!

आपल्या आजुबाजुला जुळी मुलं जन्माला आल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकल्याच असतील. एखाद्या महिलेने एकाच वेळी तीन मुलांना एकत्रित जन्म दिल्याच्या बातम्याही बर्‍याच वेळा चर्चेतही आल्या आहेत. परंतु, एखाद्या स्त्रीने एकाचवेळी 10 मुलांना जन्म दिल्याचे आपण कधी ऐकले आहे का?

अवघ्या एका महिन्यात मोडला रेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म!
गोसियामी थमारा सिटहोल
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 3:28 PM
Share

मुंबई : आपल्या आजुबाजुला जुळी मुलं जन्माला आल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकल्याच असतील. एखाद्या महिलेने एकाच वेळी तीन मुलांना एकत्रित जन्म दिल्याच्या बातम्याही बर्‍याच वेळा चर्चेतही आल्या आहेत. परंतु, एखाद्या स्त्रीने एकाचवेळी 10 मुलांना जन्म दिल्याचे आपण कधी ऐकले आहे का? दक्षिण आफ्रिकेत असेच एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. हा एक नवा विश्वविक्रम स्थापित झाला आहे. गोसियामी थमारा सिटहोल (Gosiame Thamara Sithole) नावाच्या एका महिलेने एकाच वेळी तब्बल 10 मुलांना जन्म दिला आहे (South African woman Gosiame Thamara Sithole gives birth to record 10 babies at once).

मीडिया रिपोर्टनुसार, 37 वर्षीय गोसियामी थमारा सिटहोल यांनी एकाचवेळी सात मुले आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. गर्भधारणेदरम्यान, डॉक्टरांनी त्यांना म्हटले होते की, तुम्हाला 6 मुले होऊ शकतात. परंतु, जेव्हा 7 जून रोजी गोसियामीचे ऑपरेशन झाले, तेव्हा त्यांनी एकूण 10 मुलांना जन्म दिला होता. गोसियामी म्हणतात की, त्यांना आठ मुले होऊ शकतात असे त्यांच्या नवऱ्याला वाटत होते. आपल्या सर्व मुलांना निरोगी पाहून कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी झाले आहेत.

जेव्हा गोसियामी आजारी पडल्या…

गरोदरपणात जेव्हा गोसियामी डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी म्हटले की, असे वाटते की तिच्या पोटात 6 मुले आहेत. तेव्हा त्यांनी गोसियामी यांना फार काळजी घ्यायला सांगितले. डॉक्टरांना माहित होते की, थोडासाही निष्काळजीपणा सगळ्या मुलांसाठीच धोकादायक ठरू शकतो. एक काळ असाही आला होता की, गोसियामी खूप आजारी पडल्या होत्या. त्या म्हणाल्या की, गर्भधारणेदरम्यान त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या, परंतु त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट सुरु होती की, आपली सगळी मुले निरोगी जन्मली पाहिजेत (South African woman Gosiame Thamara Sithole gives birth to record 10 babies at once).

सगळी चिमुकली निरोगी!

मीडिया रिपोर्टनुसार गोसियामीची सर्व मुले पूर्णपणे निरोगी आहेत. परंतु, सध्या त्यांना काही दिवस इनक्यूबेटरमध्ये रहावे लागणार आहे. मलऑनलाईनच्या अहवालानुसार, गोसियामीची गर्भधारणा नैसर्गिकरित्या झाली होती. गर्भधारणेदरम्यान तिला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला होता. तिच्या पाय आणि कंबरेमध्ये नेहमीच वेदना होत. त्यांना माहित होते की, एखादी चूक देखील त्यांच्या मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. तथापि, सर्वकाही व्यवस्थित झाले आणि आज गोसियामी एका गर्भधारणेत सर्वाधिक मुलांना जन्म देणाऱ्या जगातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.

अवघ्या एका महिन्यात मोडला विक्रम!

यापूर्वी हा विक्रम मोरोक्कोच्या माली येथील हलीमा सिसी नावाच्या महिलेने केला होता. हलीमा यांनी 9 मुलांना जन्म दिला होता. यात पाच मुली आणि चार मुले यांचा समावेश आहे. मात्र, गोसियामी यांनी अवघ्या एका महिन्यातच हलीमा सिसीचा विक्रम मोडीत काढला आहे.

(South African woman Gosiame Thamara Sithole gives birth to record 10 babies at once)

हेही वाचा :

Baba ka Dhaba: कोरोनामुळे नवं रेस्टॉरंट बंद पडलं, कांता प्रसाद पुन्हा स्टॉलवर कामाला

Video | इवल्याशा कासवामुळे जंगलाच्या राजाची फजिती, पाणी पिताना सिंह झाला चांगलाच परेशान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.