AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba ka Dhaba: कोरोनामुळे नवं रेस्टॉरंट बंद पडलं, कांता प्रसाद पुन्हा स्टॉलवर कामाला

कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. | Baba Ka Dhaba

Baba ka Dhaba: कोरोनामुळे नवं रेस्टॉरंट बंद पडलं, कांता प्रसाद पुन्हा स्टॉलवर कामाला
बाबा का ढाबा
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 3:19 PM
Share

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियामुळे अचानक प्रकाशझोतात झालेले ‘बाबा का ढाबा’चे (Baba ka Dhaba) मालक कांता प्रसाद यांच्यावर आपलं नवं रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे. (Baba Ka Dhaba: Baba Back To Dhaba After Restaurant Fails Says Saved 20 Lakhs For Future)

गेल्यावर्षी यूट्युबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) रातोरात प्रसिद्ध झाला होता. कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. मात्र, युट्यूबर गौरव वासनने या दाम्पत्याचा केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रीघ लागली होती.

त्यानंतर अनेक लोकांनी कांता प्रसाद यांना आर्थिक मदतही देऊ केली होती. या माध्यमातून कांता प्रसाद यांना तब्बल 45 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. याच पैशातून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. त्याचा महिन्याचा खर्च साधारण लाखभर रुपयांचा होता. मात्र, लॉकडाऊनमुळे इतर हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे त्यांचेही कंबरडे मोडले. त्यांच्या या नव्या रेस्टॉरंटचे महिन्याचे भाडे 35 हजार इतके होते. हॉटेलमध्ये लागणारे सामान, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च मिळून साधारण लाखभर रुपये लागत होते. त्या तुलनेत कांता प्रसाद यांना रेस्टॉरंटमधून 30 ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कांता प्रसाद यांनी हे रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे.

(Baba Ka Dhaba: Baba Back To Dhaba After Restaurant Fails Says Saved 20 Lakhs For Future)

संबंधित बातम्या:

Baba Ka Dhaba | ‘ढाबा’ मालक कांता प्रसाद यांची पोलीस ठाण्यात धाव, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबरविरोधात तक्रार!

ट्विटरवर ‘बाबा का ढाबा’ ट्रेंडमध्ये; ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी लोकांची रीघ

Baba Ka Dhaba | मटर पनीर खाण्यासाठी अपारशक्ती खुरानाची ‘बाबा का ढाबा’ला भेट!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.