Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

अपघातात विजेचा धक्का लागल्यामुळे एक साप गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल
snake viral video

भोपाळ : विजेच्या खुल्या तारांमधून हाय व्होल्टेजचा विद्यूत प्रवाह वाहत असतो. या तारांना चुकून हात लागला तर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. याच कारणामुळे विजेची तार तसेच ट्रान्सफार्मरपासून सर्वांनी दूर राहावे असे सर्रासपणे सांगितले जाते. मात्र, या सर्व सूचना दिलेल्या असूनदेखील अनेकवेळा गंभीर अपघात होतात. सध्या अशाच प्रकारचा एक अपघात समोर येत आहे. या अपघातात विजेचा धक्का लागल्यामुळे एक साप गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (Snake injured by electric shock fall down from 25 feet video goes viral on social media)

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील प्रकार

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा मध्यप्रदेशच्या इंदौर शहरातील आहे. या शहराच्या सिंधी कॉलिनीमधील जागृती नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जागृती नगरातील चौकामध्ये एक विजेचा खांब आहे. या खांबावर हाय व्होल्टेमध्ये वीज वाहून नेणाऱ्या विजेच्या तारा आहेत.

खांबावर चढलेल्या सापाला विजेचा जबर धक्का

या खांबावर 10 फूट लांबीचा एक साप चढला. हा साप नंतर रांगत रांगत विजेच्या तारेकडे गेला. नंतर तारेला स्पर्श केल्यामुळे या सापाला विजेचा जबर धक्का लागला आहे. या घटनेत हा साप जबर जखमी झालाय. विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे 10 फुटांचा हा साप तब्बल 25 फुटांच्या खांबावरुन खाली कोसळला आहे.

25 फुटांवरुन साप खाली कोसळला

विजेचा जबर धक्का बसल्यामुळे हा साप खांबावरुन थेट खाली कोसळला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. खांबाच्या खाली गवत असल्यामुळे खाली कोसळलेल्या सापाचा मृत्यू झाला नाही. मात्र, विजेचा जबर धक्का लागल्यामुळे हा साप चांगलाच जखमी झाला आहे. त्याच्या शरीराच्या एक भाग काम करत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी जखमी झालेल्या सापाला सर्पमित्राच्या स्वाधीन केले. खाली कोसळल्यामुळे तसेच विजेचा धक्का लागल्यामुळे हा साप जखमी झाला आहे. हा सर्व थरार पाहून नेटकरी अवाक् होत आहेत. या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | शेवटच्या घटका मोजत असलेला पक्षी पाहिला अन् माणुसकी जिवंत झाली, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

अवघ्या एका महिन्यात मोडला रेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म!

(Snake injured by electric shock fall down from 25 feet video goes viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI